Pedicure At Home: स्किन केअरचा अर्थ फक्त चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेणे इतकाच नसतो त्याचबरोबर हात-पायांच्या त्वचेची काळजी देखील घेतली पाहिजे. अनेकदा लोक हात आणि पायांच्या त्वचेकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे पायांची त्वचा कडक आणि कोरडी होऊ लागते. विशेषत: पायाच्या तळव्यांवर मृत त्वचेच्या पेशी जमा होण्यास सुरुवात होते, त्यामुळे त्वचा खडबडीत होते, टाचांना भेगा पडतात (Cracked Heels) आणि कोणत्याही क्रीम वापरल्या तरी काही परिणाम होत नाही असे दिसून येते. अशा स्थितीत पायाचे तळवे व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी फूट स्क्रब वापरू शकका जे तुम्हील घरीच तयार करू शकता. घरी स्क्रब बनवणे खूप सोपे आहे आणि हे स्क्रब तुमच्या पायाचे तळवे पूर्णपणे स्वच्छ करतो आणि त्यांना मुलायम बनवतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पायाचे तळवे स्वच्छ करण्यासाठी स्क्रब करा


साखर आणि ऑलिव्ह ऑइल
हा स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा साखर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि एक चमचा बेकिंग सोडा घ्यावा लागेल. सर्व काही एकत्र करून हे मिश्रण पायाच्या तळव्यांना लावा आणि घासून घ्या. ३ ते ४ मिनिटे घासल्यानंतर २० मिनिटे पायांवर ठेवा आणि नंतर पाय धुवून स्वच्छ करा. मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

हेही वाचा – Secret Santa गेम खेळताना चिठ्ठ्यांचा गोंधळ होतोय? आता नव्या पद्धतीने निवडा सिक्रेट सांता, जाणून घ्या सोपी ट्रिक

कॉफी आणि नारळ तेल स्क्रब
हे पाय स्क्रब बनवायला सोपे आहे आणि त्याचे चांगले परिणाम देखील दिसून येतात. तुम्हाला फक्त २ चमचे कॉफी पावडर घ्यायची आहे आणि त्यात २ चमचे साखर आणि एक चमचा खोबरेल तेल घालायचे आहे. तिन्ही गोष्टी एकत्र करून पेस्ट बनवा आणि ते पायाच्या तळव्यांवर चोळा. आता १५ ते १० मिनिटे ठेवल्यानंतर पाय धुवा. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातील आणि पाय मऊ दिसतील.

हेही वाचा – विकी कौशल कतरिनासाठी वापरतो ‘रिव्हर्स सायकोलॉजी’! तुमचा जोडीदारही ‘असा’ प्रयत्न करतो का, याला पर्याय काय? 

बेकिंग सोडा स्क्रब
बेकिंग सोडा तळव्यांची मृत त्वचा काढून टाकेल आणि कोरडेपणामुळे पायांच्या खाज सुटण्यापासून देखील आराम देईल. स्क्रब बनवण्यासाठी गरजेनुसार बेकिंग सोडा घ्या, त्यात पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट तळव्यावर लावा आणि चोळा. तळवे पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर, ही पेस्ट त्यावर १० मिनिटे राहू द्या आणि नंतर पाय धुवा आणि स्वच्छ करा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गरम पाण्यात बेकिंग सोडा टाकून या पाण्यात पाय भिजवू शकता. त्यामुळे पाय स्वच्छ करणे सोपे जाते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make foot scrub at home diy body scrub for feet snk
Show comments