Healthy Gulacha Chaha हिवाळ्यात आपली सकाळ एक कप गरम चहाने सुरू होते. अशा परिस्थितीत साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा प्यायल्याने उबदारपणा तर मिळतोच शिवाय ताजेपणा आणि ऊर्जाही मिळते. पोषक तत्वांनी समृद्ध असलेला गूळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हाच गूळ हिवाळ्यातील सुपरफूड मानला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान पोटदुखी, कंबरदुखी दूर करण्यासाठी गुळाचा चहा फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आपला तणाव कमी करतात आणि शरीराला आराम देतात. चला जाणून घेऊया त्याचे आणखी फायदे…
गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषकमुल्य असतात. गुळाचा चहा प्यायल्यानं पचन चांगले सुधारते. यामुळे छातीत जळजळ होणं, गॅस तयार होणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत नाही. गुळाचा चहा प्यायल्यानं हिमोग्लोबिन वाढते, ज्यामुळं रक्ताची कमतरता दूर होते.
प्रतिकारशक्ती वाढवते
गुळामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. गुळाचा चहा नियमितपणे प्यायल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. हिवाळ्यात गुळाचं सेवन निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे.
अशक्तपणामध्ये आराम
गूळ हे एक नैसर्गिक सूपरफूड आहे ज्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. रोज गुळाचे सेवन केल्याने लोहाच्या कमतरतेवर मात करते, ज्यामुळे अॅनिमियापासून आराम मिळतो.गुळाचा चहा प्यायल्याने अॅनिमियापासून आराम मिळतो. अॅनिमिया हा स्त्रियांमध्ये आढळणारा नेहमीचा आजार आहे. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष, खाण्यापिण्याची हेळसांड ही त्यामागची महत्त्वाची कारणं आहेत. ऑक्सिजन ज्या लाल रक्त पेशींमधून मिळतो त्या लाल रक्त पेशींममधले हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणं म्हणजे अॅनिमिया होय.
गर्भधारणेदरम्यान फायदेशीर
गरोदरपणात गुळाचा चहा प्यायल्याने महिलांना अशक्तपणा जाणवत नाही. गुळामध्ये कॅलरी, प्रोटीन, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक आढळतात. गुळाचा चहा गर्भधारणेदरम्यान अशक्तपणा कमी करतो आणि आई आणि बाळ दोघांसाठी आरोग्यदायी ठरतो. त्यामुळे गरोदर महिलांनी रोज गुळाचा चहा प्यावा.
थंडीपासून संरक्षण
हिवाळ्यात सतत गुळाचा चहा प्यायल्याने सर्दी, ताप असे आजार होत नाहीत. त्यामुळे हिवाळ्यात गुळाचा चहा पिणे खूप फायदेशीर आहे.
हेही वाचा >> Bay Leaf: एक तमालपत्राची कमाल! मधुमेहापासून हृदयापर्यंत हा ठरतो रामबाण उपाय
गुळाचा चहा कसा बनवायचा
गुळाचा चहा फाटतो अशी बऱ्याच गृहिणींची तक्रार असते. चला तर आज योग्य पद्धत जाणून घेऊयात.
गुळाचा चहा साहित्य
- १-१/२ कप पाणी
- १-१/२ कप दूध
- १ टीस्पून चहा मसाला
- ५-६ गवती चहा च्या काडया
- १/२ इंच आल्याचा तुकडा
- १ टीस्पून चहा पावडर
- १ टेबलस्पून गुळाची पावडर
गुळाचा चहा कृती
स्टेप १
सर्वात आधी पाणी उकळून त्यात तुटलेले आले आणि गवती चहा टाकून पाणी चांगले उकळून घ्यायचे
स्टेप २
पाणी उकळून झाल्यावर चहाचा मसाला टाकून परत उकळून घेऊ
स्टेप ३
आता कि चहाची पत्ती टाकून चहा उकळून घेऊ, चहा उकळून झाल्यावर दिल्याप्रमाणे दूध टाकून उकळून घेऊ.
स्टेप ४
गुळाची पावडर उकळता चहा टाकल्यावर चहा फाटू शकतो म्हणून गॅस बंद केल्यावर गुळाची पावडर टाकायची
स्टेप ५
आता चहा उकळून झाल्यावर गॅस बंद करून देऊ गॅस बंद केल्यावर गुळाची पावडर टाकून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ
स्टेप ६
आता तयार चहा गाळून बरोबर बिस्कीट,टोस्ट सर्व करू