How to Make Jaggery Tea: आपल्या दैनंदिन जीवनात साखरेचं सेवन आपण अगदी सर्रास करतो. परंतु, साखरेचे अनेक दुष्परिणाम आहेत. अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने ती शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून साखरेसाठी पर्याय म्हणून गुळाचा, मधाचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक जण हल्ली गुळाच्या चहाला पसंती देतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात जवळजवळ प्रत्येकाच्याच घरात दिवसातून कमीत कमी एकदा तरी चहा केला जातो. जगभरात लोकप्रिय असलेलं पेय म्हणून चहाचा दर्जा आहे. त्यातल्या त्यात भारतात चहाप्रेमींची संख्या जरा अधिकच आहे. परंतु, दररोज साखरेचा चहा घेतल्याने त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात, म्हणून साखरेऐवजी गुळाचा चहा घेणं सगळ्यांच्या फायद्याचंच ठरतं.

हेही वाचा… Hibiscus Flower Tips: जास्वंदीला भरपूर कळ्या आणि गडद रंग येण्यासाठी करा ‘हा’ सोपा उपाय; श्रम आणि पैसे वाचवणारा VIDEO एकदा पाहाच

अनेकदा दुधाचा चहा करताना दूध नासतं आणि त्यामुळे सगळा चहा खराब होतो, म्हणून पुन्हा पुन्हा आपण तसा चहा करणे टाळतो. पण थांबा, तुम्हाला माहीत आहे का, की ही एक पद्धत वापरली तर गुळाचा चहा (Jaggery Tea) करताना दूध अजिबात नासत नाही. तसंच चहादेखील अगदी फक्कड होतो.

गुळाचा चहा करताना नासू नये म्हणून करा ‘हा’ सोप्पा उपाय (Remedy while making jaggery tea)

साहित्य (Jaggery Tea Ingredients)

  • चहा पावडर
  • एक कप दूध
  • एक कप पाणी
  • गूळ
  • चहाचा मसाला
  • आले

हेही वाचा… कुकर काळपट पडलाय? ‘हे’ तीन उपाय करतील तुमचं काम सोप्पं; आताच ट्राय करा हा Kitchen Jugaad

कृती (Jaggery Tea Recipe)

  • प्रथम एका भांड्यात एक कप दूध उकळून घ्या.
  • त्यानंतर चहाच्या भांड्यात एक कप पाणी घेऊन त्यात साखरेच्या चहासाठी जितकी चहा पत्ती घेता तितकीच घ्या.
  • नंतर त्यात गूळ टाकून तो चांगला वितळवून घ्या. चहाला एक उकळी येऊ द्या आणि मग गॅस बंद करा.
  • आता तयार झालेला कोरा चहा उकळलेल्या दुधात टाका आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्या.
  • उकळत्या चहात दूध टाकल्याने ते फाटते त्यामुळे आधी दूध उकळवून मग त्यात चहा टाकणेच सोयीस्कर ठरते.
  • आता तयार झालेला हा फक्कड चहा पावसाळ्यात प्या आणि अतिप्रमाणात साखरेचा वापर टाळा.

हेही वाचा… पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणानंतर करा ‘या’ १० हस्त मुद्रा; आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

आता तयार झालेला हा फक्कड चहा पावसाळ्यात प्या आणि अतिप्रमाणात साखरेचा वापर टाळा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make jaggery tea without spoiling milk remedy and tips of jaggery tea dvr