How to make kanda bhaji crispy expert advice: पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि खमंग भजी, पकोडे खाण्याची इच्छा सर्वांनाच होते. चमचमीत गोष्टी खाण्याचा मोह आवरत नसला तरी तेलकट तुपकट गोष्टी जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्याचा आपल्याला त्रास होतो. परंतु त्या प्रमाणात खाल्ल्या तर जीभेचे चोचले तर पूर्ण होतातच पण आरोग्यावरही याचा जास्त परिणाम होत नाही.

शेफ विक्रम अरोरा, सह-संस्थापक, आणि नक्ष रेस्टॉरंटचे पाककला संपादक, यांनी कांदा भजी/पकोडे करताना काही अशा टिप्स indianexpress.com बरोबर शेअर केल्या आहेत ज्यामुळे तुमचा आवडीचा पदार्थ खमंग आणि कुरकुरीत होईल. चला तर मग सुरुवात करूया.

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
How to make Methi Kadhi marathi Methi Kadhi recipe marathi Methi Kadhi recipe
थंडीत वाफाळत्या भातासोबत खा पौष्टिक ‘ मेथीची कढी’! खास रेसिपी
Mushrooms benefits Eating 5 Mushrooms Daily May Help Combat Heart Disease And Dementia
दररोज ५ मशरूम खाल्ल्याने शरिरावर काय परिणाम होतात; फायदे ऐकून लगेच आहारात समावेश कराल
Alia Bhatt Viral Video
तोंडाला मास्क, साधा लूक…; आलिशान गाडी सोडून आलिया भट्टचा रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा… अजबच! मुंबई लोकलच्या दरवाजावर पठ्ठ्याने चिकटवला फोन अन् गाणी ऐकण्यासाठी केला ‘असा’ जुगाड, VIDEO पाहून नेटकरी म्हणाला, “डब्बा लगेज, अंकल सेवेज”

‘या’ टिप्सनुसार भजी/पकोडे कराल तर होतील कुरकुरीत (How to make kanda bhaji crispy)

  • तयार असलेलं पिठाचं मिश्रण भाजीला कोट करण्यासाठी पुरेसं जाड असाव परंतु जास्त घट्ट नसावं.
  • जर पिठात जास्त प्रमाणात पाणी असेल तर पकोडे मऊ होऊ शकतात.
  • २०-२५ मिनिटे मिश्रणाला वेळ दिल्यास ते चांगले मिक्स होते.
  • मिश्रणात बेकिंग सोडा अ‍ॅड करणे हे पिठाच्या प्रमाणावर अवलंबून असते. जर तुम्ही अगदी कमी प्रमाणात पदार्थ बनवत असाल तर भजी बाहेरून कुरकुरीत करण्यासाठी एक चिमूटभर सोड्याचं प्रमाण योग्य ठरतं.
  • पिठात गरम तेल घातल्याने भजी कुरकुरीत (How to make kanda bhaji crispy) होण्यास मदत होते.
  • तेलाचे प्रमाण पिठाच्या प्रमाणानुसार घ्यावे लागेल. घरगुती वापरासाठी बनवल्यास एक वाटी पिठात एक चमचा तेल असावं,” असं शेफ अरोरा म्हणाले.
  • पकोडे तयार करण्यासाठी ताज्या भाज्या कापून घ्या, त्यामुळे चव वाढते.

हेही वाचा… Jaggery Tea: फक्कड गुळाचा चहा करताना दूध नासतंय? मग घरच्या घरी करा ‘हा’ सोपा उपाय आणि वाचवा पैसे

मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनीही इंस्टाग्रामवर काही टिप्स शेअर केल्या आहेत.

  • फक्त बेसन किंवा चण्याचे पीठ वापरू नका, मिश्रणात तांदळाचे पीठ घातल्यास पीठ घट्ट होण्यास मदत होते.
  • जर तुम्हाला जास्त पदार्थात कुरकुरीतपणा (How to make kanda bhaji crispy) हवा असेल तर डबल फ्राय करून पहा. म्हणजेच तळलेले पकोडे पुन्हा एकदा तळण्यासाठी टाकावे लागतील.
  • पकोडे बनवण्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक तुमचं मिश्रण गरम तेलात हळूवार टाकाव आणि गॅस मंद आचेवर ते तळून घ्यावं. यामुळे तुमचे भजी/पकोडे जळणार नाहीत.

हेही वाचा… Hibiscus Flower Tips: जास्वंदीला भरपूर कळ्या आणि गडद रंग येण्यासाठी करा ‘हा’ सोपा उपाय; श्रम आणि पैसे वाचवणारा VIDEO एकदा पाहाच

Story img Loader