How To Make Natural Lip Balm At Home : थंडी सुरू झाली की, त्वचा कोरडी पडणे, चेहरा खरखरीत वाटू लागणे, हाता-पायांची साले निघणे, ओठ फाटणे आदी अनेक समस्या सतावू लागतात. थंडी वाढली की, कोरड्या हवामानाचा तुमच्या ओठांवर वाईट परिणाम होऊ लागतो. हवेत ओलावा नसणे आणि घरातील उष्णता यांमुळे ओठांची नैसर्गिक आर्द्रता निघून जाते आणि त्यामुळे ओठ कोरडे होऊ लागतात. अशा परिस्थितीत आपण ओठ मऊ आणि हायड्रेट ठेवण्यासाठी व्हॅसलिन, लिप बाम आदींसारखी बाजारामध्ये मिळणारी अनेकविध उत्पादने वापरतो. हायड्रेटिंग बाम वापरल्याने तुमचे ओठ दिवसभर हायड्रेट राहतात. पण, तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही विकत न घेता घरच्या घरीही लीप बाम बनवू शकता (Home Made Lip Balm) …

तेव्हा तुम्ही नैसर्गिक रीतीने घरी बनवून पाहू शकता असे काही लिप बाम खालीलप्रमाणे (Home Made Lip Balm):

१. तुपापासून बनवा लिप बाम

अर्धी वाटी बीट किसून, त्याचा रस गाळून घ्या. आता बीटाच्या रसात एक चमचा तूप मिसळा. हे मिश्रण एका लहान कंटेनरमध्ये घाला आणि ते थंड करा. अशा प्रकारे तुमचा लिप बाम घरच्या घरी तयार झाला. तूप ओठांच्या त्वचेला खोलवर हायड्रेट करण्यास मदत करून, आर्द्रता कमी करते.

Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Lays Paneer Bites Recipe in marathi easy paneer recipe
१० रुपयांच्या चिप्सपासून बनवा पनीरचा ‘हा’ खास पदार्थ, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट! लगेच वाचा रेसिपी
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

हेही वाचा…Papaya Health Benefits : पपई गरम असते की थंड? हिवाळ्यात खाल्ल्याने ‘या’ तीन समस्यांवर ठरू शकतो रामबाण उपाय

२. मेणापासून लिप बाम

मेणाचा लिप बाम बनविण्यासाठी एक चमचा मेण, एक चमचा खोबरेल तेल, एक चमचा मध व दोन व्हिटॅमिन ई कॅप्सुल्स घ्या. मेण एका सॉस पॅनमध्ये ठेवा आणि ते मध्यम आचेवर वितळवा. मेण वितळल्यावर त्यात खोबरेल तेल आणि मध यांचे काही थेंब टाका. त्यानंतर या मिश्रणात व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल घाला. हे मिश्रण व्यवस्थित मिसळा आणि नंतर ते एका कंटेनरमध्ये ओता. सुमारे ३० मिनिटे मिश्रण थंड होऊ द्या. अशा प्रकारे तुमचा होम मेड लिप बाम तयार आहे(Home Made Lip Balm) ; जो ओठांना मऊ आणि हायड्रेट ठेवेल.

३. खोबरेल तेलाचा लिप बाम

नारळाच्या तेलाचे नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म ओठांना हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. या लिप बाममुळे ओठ तासन् तास मऊ आणि चमकदार राहतील. खोबरेल तेल आणि पेट्रोलियम जेली समान प्रमाणात घेऊन ते एकत्र मिसळा. हे मिश्रण हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा आणि सुमारे ३० मिनिटे गोठवा. तुम्ही सुगंधासाठी तुमच्या आवडत्या आवश्यक तेलांपैकी एका तेलाचे एक किंवा दोन थेंबदेखील त्यात मिसळू शकता. अशा प्रकारे घरगुती खोबरेल तेलाचा लिप बाम वापरण्यासाठी तयार आहे (Home Made Lip Balm) .

Story img Loader