Holi 2022: रंगपंचमी किंवा होळी म्हणजे रंगांचा सण. या रंगांच्या सणावर आजकाल भीतीचं सावट आहे. ही भीती आहे रासायनिक रंगांची आणि त्यामुळे शरीराला होणाऱ्या नुकसानाची. मात्र यंदाची रंगपंचमी भीतीच्या सावटाखाली नको जायला, त्यामुळे सणाचा उत्साह कमी नको व्हायला यासाठी अगदी सोपे उपाय आहेत. आता तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक रंग तयार करू शकता.
फक्त कोरडेच नव्हे तर ओले नैसर्गिक रंगही तुम्ही घरी बनवू शकता, तेही फुलापानांपासून…संपूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेने. जाणून घ्या त्याबद्दलच्या काही टिप्स.
तुम्ही विविध प्रकारच्या फुलांपासून अनेक रंग बनवू शकता. त्यासाठी सर्वप्रथम ज्या फुलांपासून रंग बनवायचे आहेत ती फुले गोळा करा. सर्व फुले नीट धुवून नंतर ती उन्हात वाळवा. सर्व फुले सुकताच त्यांची पाने वेगळी करून चांगली बारीक करून पावडर बनवा. अशा प्रकारे तुम्ही नैसर्गिक कोरडा रंग तयार करू शकता.
तर ओला रंग बनवण्यासाठी तुम्हाला हव्या त्या फुलांच्या पाकळ्या गोळा करा. या पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सुगंधासाठी यात तुम्ही चंदनाचं तेलही मिसळू शकता. अशा प्रकारे ओला रंग तयार होईल.
कोणत्या फुलांपासून कोणता रंग मिळतो?
- पिवळा रंग – झेंडू, बहावा, शेवंती
- निळा रंग – गुलमोहर
- केशरी रंग – पळस
- लाल रंग – लाल गुलाब, लाल जास्वंद
- जांभळा रंग – लव्हेंडर
- हिरवा रंग – कडुलिंबाची पानं.