How to make Makyachi bhakri: हिवाळ्याच्या दिवसांत अनेक जण मक्याची भाकरी खाणे पसंत करतात. मक्याच्या भाकरीमध्ये उष्णता असते, जी हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. परंतु, ही भाकरी चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी बनवायला तितकीच कठीण आहे.
मक्याची भाकरी बनवताना ती अनेकदा मधूनच तुटते किंवा त्याचे पीठ हाताला चिकटू लागते. जर तुम्हालाही अनेकदा अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असेल आणि यामुळे तुमची आवडती मक्याची भाकरी तुम्ही खाऊ शकत नसाल, तर आज आम्ही तुम्हाला ही भाकरी बनविण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत; ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी सहजपणे मक्याची भाकरी बनवू शकता.
मक्याची भाकरी कशी बनवायची?
हेही वाचा: कोबीच्या भाजीतील सूक्ष्म किडे काढण्यासाठी ‘या’ तीन सोप्या टिप्स करतील मदत
- परफेक्ट मक्याची भाकरी बनवण्यासाठी पीठ व्यवस्थित मळून घेणे खूप गरजेचे आहे. जेव्हा मक्याचे पीठ छान मळले जाते तेव्हा त्यापासून बनवलेल्या भाकरीही खूप मऊ आणि फुगीर होतात.
- त्यासाठी एका पातेल्यात एक कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
- पाणी थोडे गरम झाल्यावर त्यात एक चमचा तूप घाला.
- तूप पाण्यात वितळल्यानंतर गॅस बंद करा.
- त्यानंतर गरम पाण्यात समान प्रमाणात म्हणजे एक कप मक्याचे पीठ घाला आणि चमच्याने लगेच हलवा.
- पाणी आणि पीठ थोडे घट्ट झाल्यावर १५ मिनिटे झाकून ठेवा.
- ठरलेल्या वेळेनंतर हाताला तूप लावून पीठ थोडे कोमट असेल तेव्हाच हाताने मळून घ्या.
- मऊ पीठ तयार झाल्यावर पीठ स्वच्छ कापडाने झाकून, त्याचे छोटे गोळे बनवा.
- त्यानंतर एकेक गोळा घेऊन त्याची भाकरी थापून, ती भाजून घ्या.
- या पद्धतीचा अवलंब केल्याने तुम्हाला दिसेल की, मक्याची भाकरी न मोडता किंवा हाताला चिकटल्याशिवाय सहज बनते.