आपण पनीरपासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची यादी करायला घेतली तर ती संपत संपणार नाही. प्रत्येकाचंच ते आवडतं आहे. पनीरपासून बनवले जाणारे पदार्थ आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती असंख्य आहेत. पनीर हा एक असा पदार्थ आहे ज्याशिवाय भारतीय बुफे कधीही पूर्ण होऊ शकत नाही. पनीरपासून बनणारे जवळपास सगळेच पदार्थ हे अगदी साधे-सोपे आणि अत्यंत चविष्ट असतात. तुम्हाला घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला बनवायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला त्यासाठीची रेसिपी सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनीर बटर मसाला

साहित्य :

  • २५० ग्रॅम पनीर
  • ३ मध्यम आकाराचे टोमॅटो
  • १-२ हिरव्या मिरच्या
  • १ इंच आल्याचा तुकडा
  • १/२ कप क्रीम
  • २ चमचे बटर
  • २ चमचे कोथिंबीर
  • १/४ टीस्पून लाल तिखट
  • १/४ टीस्पून हळद पावडर
  • १ टीस्पून धणे पूड
  • १ टीस्पून कोरडी मेथीची पाने
  • चवीनुसार मीठ
  • १/४ टीस्पून गरम मसाला
  • १/४ टीस्पून जिरे पूड

कृती :

  • टोमॅटो, हिरवी मिरची आणि आलं स्वच्छ धुवून घ्या.
  • टोमॅटो, हिरव्या मिरच्या व्यवस्थित चिरून घ्या. आलं सोलून आणि बारीक कापून घ्या.
  • हे सर्व साहित्य मिक्सर भांड्यात काढून घ्या. बारीक करून बारीक पेस्ट बनवा.
  • आता कढईत १ चमचा बटर घाला.
  • बटर वितळल्यावर जिरे पावडर, धणे पावडर, हळद पावडर घालून थोडावेळ परता.
  • तसेच टोमॅटो-हिरवी मिरची-आलं पेस्ट, लाल तिखट आणि सुक्या मेथीची पाने घाला.
    हा मसाला व्यवस्थित परता.
  • आता या मसाल्यात क्रीम, गरम मसाला, कोथिंबीर आणि मीठही घाला.
  • आता या ग्रेव्हीमध्ये १/२ कप पाणी घाला आणि पुन्हा उकळी येईपर्यंत शिजवा.
  • ग्रेव्ही उकळू लागल्यावर त्यात पनीरचे तुकडे घाला. पॅन झाकून ठेवा आणि भाजी ३ ते ४ मिनिटं मंद आचेवर शिजवा. ३ ते ४ मिनिटांनंतर त्यावर पुन्हा लोणी घाला.
  • तुमचं रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला तयार आहे. आता गरमागरम चपाती, पराठा, नान किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

नोएडामधील गृहिणी निशा मधुलिकाने http://www.nishamadhulika.com ची सुरुवात २००७ मध्ये केली. २०११ च्या मध्यावर त्यांनी आपलं यूट्यूब चॅनेल सुरू केलं. त्यांचीच ही रिसीपी.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make restaurant style paneer butter masala gst