How To Make Rose Water Face Pack: गुलाब पाणी असा पदार्थ आहे जो पूर्वीच्या काळाता सोंदर्य वाढवण्यासाठी वापरले जात असे. गुलाब पाणी स्वस्त असण्याबरोबरच त्वचेसाठी चांगले असते. आज आम्ही तुम्हाला गुलाबपाण्याचे आइस क्यूब्स कसे तयार करायचे याबाबत सांगणार आहोत.
गुलाबपाणी उन्हाळ्यात तुमची त्वचा हायड्रेट ठेवते. यामुळे तुमची त्वचेला खोलवर पोषण मिळते. यासोबतच गुलाब पाण्याचा वापर तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा आणि साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करते. गुलाब पाण्याचे आइस क्यूब्स तुमच्या त्वचेला त्वरित ताजेतवाने करतात, चला जाणून घेऊया) गुलाब पाण्याचे आइस क्यूब्स कसे बनवायचे.
हेही वाचा – रोज पाणी टाकूनही तुळस सुकतेय? मग ‘हे’ उपाय करा, सुकलेलं तुळशीचं रोपटं देखील होईल हिरवेगार
गुलाब पाण्याचे आइस क्यूब्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
- गुलाब पाणी
- काही गुलाबाच्या पाकळ्या
- बर्फा तयार करण्याचा साचाॉ
हेही वाचा – फाटलेले जुने पडदे फेकून देताय? पैसे वाचवायचे असतील तर ‘असा’ करा त्याचा पुन्हा वापरा, जाणून घ्या सोप्या टिप्स
गुलाब पाण्याचे आइस क्यूब्स कसे बनवायचे?
- गुलाब पाण्याचेआइस क्यूब्स बनवण्यासाठी सर्वप्रथम एक भांडे घ्या.
- मग त्यात गुलाबपाणी टाका आणि गुलाबाचं फूल घ्या.
- यानंतर गुलाबाची काही पाकळ्या काढा.
- त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात मिसळा.
- यानंतर हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये भरून ठेवा.
- नंतर सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
- आता तुमचे गुलाब पाण्याचे आइस क्यूब्स तयार आहेत.
- नंतर तयार केलेले चौकोनी आइस क्यूब्स स्वच्छ चेहऱ्यावर लावून मसाज करा.