Skin Care: बाजारामध्ये कित्येक ब्युटी प्रॉडक्ट उपलब्ध असतात आणि एकापेक्षा एक असे प्रॉडक्ट मिळत आहे. पण त्यांची किंमत खूप जास्त असत. बहूतेक प्रॉडक्टमध्ये केमिकलयुक्त असतात जे त्वचेसाठी हानिकारक ठरतात. अशामध्ये तुम्ही घरातील काही वस्तू वापरून स्क्रब (Homemade Scrub) तयार करू शकता. हे स्क्रब पूर्णपणे नैसर्गिक असतात आणि त्याचबरोबर त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात आणि खिश्यालाही झळ बसत नाही. स्क्रबच्या वापरामुळे स्किन एक्सफोलिएट होते ज्यामुळे मृत त्वचेच्या पेशी आणि साचलेली घाण निघून जाते. या घरगुती स्क्रबमुळे चेहऱ्यावर चमक येते आणि रंग उजळतो. चला जाणून घ्या चेहरा स्क्रब करण्याचे सोपे फायदे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरी स्क्रब कसा बनवायचा?

चेहर्‍याला स्क्रब केल्याने त्वचेच्या पृष्ठभागावर साचलेली घाण निघून जाते, क्लोग्ड पोर्सचा त्रास होत नाही, स्क्रबचा तेलकट त्वचेवर चांगला परिणाम होतो, स्क्रबमुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि त्वचेतील घाण काढून ती स्वच्छ आणि चमकदार बनते.

शुगर स्क्रब
एक वाटी घ्या, त्यामध्ये एक चमचा नारळाचे तेल, एक चमचा साखर आणि १ ते २ चमचे लिंबूचा रस मिसळा. या मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने स्क्रब करा. हे स्क्रब तुम्ही चेहऱ्यावर गरजेपेक्षा जास्त वेळा घासू नका.

कॉफी स्क्रब
कॉम्बिनेशन स्किनसाठी कॉफी स्क्रब (Coffee Scrub) खूप फायेदशीर ठरेल. हे स्क्रब तयार करण्यासाठी तुम्हाला एक चमचा वाटलेली कॉपीमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल टाका. बास…तुमचा होममेड स्क्रब तयार आहे. या आठवड्यात एकदा वापरू शकता.

टोमॅटो स्क्रब
त्वचेचे टॅनिंग दूर करण्यासाठई हे स्क्रब खूप फायदेशीर आहे. एक चमचा वाटलेले टोमॅटो घ्या आणि त्यामध्ये एक चमचा साखर मिसळा आणि चेहऱ्यावर स्क्रब करा. टोमॅटोचे तुकडे साखरमध्ये टाकून चेहऱ्यावर चोळा.

पपई स्क्रब
जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर मोठे खड्डे दिसले, हे व्हाईटहेड्स आहेत, तर तुम्ही हा फेस स्क्रब बनवून लावू शकता. पपईच्या गरामध्ये एक चमचा साखर आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून हा स्क्रब तयार करता येतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make scrub at home using sugar coffee tomato papaya homemade scrub glowing face snk
Show comments