लग्नानंतर नवरा-बायको या नव्या नात्याची सुरुवात होते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी व समजूतदारपणा असेल तरच हे नाते टिकते. नवरा आणि बायको दोघांनीही हे नाते जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नवरा-बायकोचे नाते घट्ट कसे करावे, यासाठी प्रत्येक जोडप्याने काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.
दिवसाची सुरुवात उत्तम झाली, तर दिवसही उत्तम जातो. जर प्रत्येक विवाहित जोडप्याने सकाळी उठल्यानंतर ही पाच कामे केली, तर नवरा-बायकोचे नाते घट्ट होण्यास मदत होऊ शकते.
१. सकाळी उठल्यानंतर ‘गुड मॉर्निंग’ म्हणायला विसरू नका
सकाळी जर तुम्ही तुमच्या पार्टनरला ‘गुड मॉर्निंग’ म्हणत असाल, तर दिवसाची सुरुवात उत्तम होऊ शकते. तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा दिवस खूप चांगला जाऊ शकतो. नाते घट्ट करण्याची ही एक सोपी ट्रिक आहे.
२. एकमेकांबरोबर चहा आणि ब्रेकफास्ट घ्या
जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या पार्टनरबरोबर चहा आणि ब्रेकफास्ट घेत असाल, तर ही एक चांगली सवय आहे; जी तुमचे नाते अधिक घट्ट बनवू शकते. पण, लक्षात ठेवा चहा किंवा ब्रेकफास्ट करताना सकारात्मक गोष्टींवर चर्चा करा.
हेही वाचा : नवऱ्यांनो, बायको तुमच्यावर रागावली आहे? असा करा तिचा राग शांत, ट्राय करा या टिप्स
३. पार्टनरला धन्यवाद म्हणा
आपला पार्टनर आपल्यासाठी अनेक गोष्टी करतो; पण आपण अनेकदा त्याला गृहीत धरतो आणि कधीच आभार व्यक्त करीत नाही. पण, नाते घट्ट करायचे असेल, तर पार्टनरला दररोज धन्यवाद म्हणा. त्यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम आणि सलोखा वाढू शकतो.
४. पार्टनरबरोबर व्यक्त व्हा
पार्टनरबरोबर सकाळी कमीत कमी दहा मिनिटे तरी निवांत बोला. प्रेम व्यक्त करा, मजा मस्ती करा किंवा दिवसाभराच्या प्लॅनिंगविषयी चर्चा करा पण सकाळी पार्टनरला थोडा वेळ देणे गरजेचे आहे.
हेही वाचा : Friendship Day 2023 : या वर्षी केव्हा आहे ‘फ्रेंडशिप डे’? जाणून घ्या इतिहास अन् बरंच काही
५. प्रेम व्यक्त करा
सकाळी सकाळी पार्टनरसमोर प्रेम व्यक्त करा. तुम्ही पार्टनरला सकाळी आवडते फूल देऊन ‘गुड मॉर्निंग’ अशा शुभेच्छा देऊ शकता किंवा घरातून बाहेर पडण्यापूर्वी मिठी मारू शकता. या कारणामुळे तुमच्या शरीरात हॅप्पी हार्मोन्स निर्माण होऊ शकतात आणि तुमचा दिवसही उत्तम जाऊ शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)