Sugandhi Utane Recipe at Home : दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. देशभरात मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळी पाच दिवसांचा सण असतो. प्रत्येक दिवसाचे एक आगळे वेगळे महत्त्व असते. दिवाळी आली की खरेदी सुरू होते. कपडे, दागिने, वस्तु खरेदी केल्या जातात. प्रत्येकाच्या घरी आनंदोत्सव साजरा करत दिवे लावले जातात. दिवाळी आली की अभ्यंगस्नान करताना शरीराला सुंगधी उटणे लावले जातात. हे सुंगधी उटणे दिवाळीत आपल्या त्वचेला चमक देतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही उटणे खरेदी करता का? यंदा उटणे खरेदी करू नका तर घरी बनवा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की घरच्या घरी उटणे कसे बनवायचे, त्यासाठी आम्ही तुम्हाला दोन पद्धत सांगणार आहोत. तुम्हाला सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही घरीच उटणे तयार करू शकता.

साहित्य

  • आवळा पावडर
  • नागरमोथा पावडर
  • अनंतमूळ पावडर
  • वेखंड पावडर
  • कचूर सुगंधी पावडर
  • मूलतानी पावडर
  • मसूर डाळीचे पीठ/बेसन
  • आंबे हळद पावडर
  • (वरील सर्व साहित्य तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात किंवा ऑनलाइन सुद्धा मिळेन.)

कृती

  • सर्वप्रथम आवळा पावडर, नागरमोथा पावडर, अनंतमूळ पावडर, वेखंड पावडर, कचूर सुगंधी पावडर,मूलतानी पावडर, मसूर डाळीचे पीठ/बेसन
  • आणि आंबे हळद पावडर एकत्र करा
  • त्यानंतर हे सर्व मिश्रण नीट चाळून घ्या.
  • तुमचे उटणे तयार होईल.
  • दिवाळीकरीता आयुर्वेदिक उटणे तुम्ही अशाप्रकारे बनवू शकता.

हेही वाचा : Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात

पाहा व्हिडीओ

याशिवाय तुम्ही खालील पद्धतीने सुद्धा उटणे तयार करू शकता.

साहित्य

  • बेसन
  • दूध
  • क्रिम
  • हळद
  • लिंबाचा रस
  • तीळ
  • गुलाब जल

कृती

  • बेसन, दूध, क्रिम, हळद, लिंबाचा रस, तीळ, गुलाब जल सर्व साहित्य एकत्र करा
  • त्यानंतर मिक्सरमधून त्यांची चांगली पेस्ट तयार करून घ्या.
  • तुमचे सुगंधी उटणे बनवून तयार होईल.

वरील दोन्ही उटणांमुळे तुमची त्वचा चांगली मऊ आणि तजेलदार बनेल. वरील दोन्ही उटणे केमिकलयुक्त नसल्यामुळे तुमच्या त्वचेवर याचा कोणताही विपरीत परिणाम दिसून येणार नाही.

हेही वाचा : Jugaad Video : डाळिंब कसे सोलतात? जाणून घ्या योग्य पद्धत, पाहा व्हिडीओ

उटणे लावण्याचे फायदे जाणून घेऊ या.

  • त्वचेवर चमक आणण्यासाठी उटणे अत्यंत फायदेशीर आहे.
  • डागविरहीत त्वचेसाठी उटणे हे अतिशय उपयुक्त आहे.
  • उटणे हे अॅक्ने रोखण्यास तसेच त्वचेमध्ये उजळपणा आणण्यास मदत करते.
  • ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तसे त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी सुद्धा उटणे फायदेशीर आहे.
  • उटणे त्वचेवरील खाज थांबवते
  • उटणे लावल्याने त्वचेत आवश्यक तेवढा ओलांवा टिकून राहतो आणि त्वचा मुलायम बनते.
  • उटणे लावल्याने त्वचा विकार दूर होतात.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make sugandhi utane at home watch video to know easy sugandhi utane recipe ndj