Tulsi Water Benefits :तुळशीच्या पाण्याचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. अनेक घरगुती उपायांमध्ये तुळशीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तुळशीच्या औषधी गुणांमुळे याचे सेवन केले जाते, जे अनेक रोगांवर रामबाण औषध सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सर्दी -खोकला आणि पचन अशा अनेक समस्यांवरही तुळशीच्या सेवनाने मात करता येते. तुळशीचे असेच काही फायदे आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही एका क्षणात तुमच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला तुळशीचे पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुळशीच्या पानांचे पाणी रोज रिकाम्या पोटी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते कसे बनवायचे आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात.

तुळशीच्या पानांचे पाणी

यासाठी एका पातेल्यात एक ग्लास पाणी घालून चांगले उकळू द्या. पाणी उकळल्यावर तुळशीची पाने घाला. पाण्याचे प्रमाण निम्म्यावर येईपर्यंत हे पाणी उकळा. यानंतर, गॅस बंद करा आणि फिल्टर करा. चव वाढवण्यासाठी मध देखील यामध्ये मिक्स केला जाऊ शकतो.

हे आहेत आश्चर्यकारक फायदे

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते

तुळशीचे पाणी चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे, चरबी आणि कार्बोहायड्रेट बर्न करण्यास मदत होईल. तसेच रक्तातील साखरेची पातळी राखते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.

वजन कमी करते

आज प्रत्येक व्यक्ती वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहे. कारण लठ्ठपणा इतर रोगांना आमंत्रण देतो. वास्तविक तुळशीचे पान चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते.

हेही वाचा – Almond Benefits: बदाम सोलून खावेत की न सोलता? जाणून घ्या बदाम खाण्याची योग्य पद्धत

पाचक प्रणालीसाठी चांगले

जर तुम्हाला अपचन आणि अॅसिडिटीची समस्या असेल तर रोज 2 ते 3 पाने चावून खा. याशिवाय तुळशीच्या पानांचा रस आणि लिंबाचा रस मिसळून नारळाचे पाणी प्यायल्याने पोटदुखी दूर होते.

रोगप्रतिकारक शक्ती

तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात. यामुळे केवळ सर्दी, खोकलाच नव्हे तर पचनाशी संबंधित समस्या देखील दूर होतील. तुळशीची पाने पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात. यासह आम्लपित्त (Acidity) आणि पोटातील जळजळ होण्याची समस्या देखील दूर करतात. तुळशीची पाने शरीराची पीएच पातळी संतुलित किंवा योग्य राखण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make tulsi water and its untold benefits it is beneficial to drink basil water on an empty stomach every day tulsi water benefits for babies srk
Show comments