आंघोळीपासून कपडे आणि भांडी धुण्यापर्यंत अनेक प्रकारच्या कामांसाठी साबणाचा वापर केला जातो. पण सर्वप्रकारच्या साबणांच्या वाढत्या किमती पाहता त्याचा योग्य वापर कसा करायचा जाणून घेणे फार महत्वाचे आहे. नाहीतर साबणाची वडी आठवड्याच्या आतच संपते. यात काहीजण घरात एकत्र सर्वप्रकारचे साबण आणून ठेवत नाही, अशावेळी एक साबण संपला की तो विकत घ्यायला जाणे हे फार कंटाळवाणे काम असते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही असे प्रभावी ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही साबण आठवड्यापेक्षा जास्त दिवस वापरु शकता.
साबण बरेच दिवस वापरण्यासाठी त्याचे दोन समान आकाराचे तुकडे करा, याच्या मदतीन तुम्ही साबणावरील निम्मा खर्च कमी करु शकता. कारण तुम्ही आधी संपूर्ण साबणाची वडी वापरत होता. तेव्हा त्याचा जास्त वापर व्हायचा पण आता तुकड्यामुळे हा वापर कमी होईल, शिवाय साबणाचा विरघळून होणारा चिखलही कमी होईल.
साबण डिशमध्ये ठेवा
साबणाचा वापर करुन झाल्यानंतर तो सोप डिशमध्ये ठेवा, यामुळे साबण खराच वेळ कोरडा राहतो, तसेच साबणात पाणी राहत नाही आणि तो विरघळतही नाही.
सोप सेव्हर बॅग वापरा
साबणाची वडी तुम्ही सोप सेव्हर बॅगमध्येही ठेवू शकता. तुम्ही ती बॅग सहज कुठेही लटकव ठेवू शकता. यामुळे साबण लवकर सुकतो, शिवाय पाण्यात विरघळण्याची चिंता नसते.
साबण पाण्यात ठेवू नका
साबणाची वडी खूप वेळ पाण्यात राहिल्यास ती आठवड्याच्या आतच संपण्याची शक्यता असते. यामुळे साबण ठेवण्यासाठी अशी जागा निवडा जिथे तो पाण्यापासून दूर राहील.