Husband Wife : लग्नानंतर नवरा बायकोचे एक नवीन आयुष्य सुरू होते. त्यांच्या या नवीन नात्यात प्रेम, गोडवा, आपुलकी, काळजी समजूतदारपणा दिसून येतो. दोघेही एकमेकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात.
असं म्हणतात, बायकांना समजून घेणे खूप कठीण आहे. अशात बायकोला आनंदी ठेवणे हे नवऱ्यासाठी एक मोठं आव्हान असू शकते. आज आपण लग्नानंतर बायकोला कसं आनंदी ठेवायचं, याविषयी काही टिप्स जाणून घेणार आहोत.

  • लग्नानंतर एकमेकांना समजून घेणं हे खूप मोठं आव्हान असतं. जर पत्नी नाराज असेल किंवा रागात असेल तर तुम्ही अशावेळी शांत राहा. तुम्ही काहीही बोलू नका आणि शांतपणे परिस्थिती हाताळा. जर पत्नीने काही चूक केली असेल तर ओरडू नका आणि तिला समजावून सांगा.

हेही वाचा : कोणत्या वयात रिलेशनशिपमध्ये यावे? जाणून घ्या…

  • जर पत्नी नाराज असेल तर तिच्याबरोबर खूप प्रेमाने वागा. कधीही तिच्या रागाला किंवा नाराजीला चुकूनही ड्रामा म्हणू नका. नाराजी दूर होईपर्यंत शांत राहा. तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा.
  • जर पत्नी खूप रागात असेल तर किंवा नाराज असेल तर तिचा राग शांत करण्यासाठी तिला प्रेमाने आलिंगन द्या आणि तुम्ही तिच्याबरोबर नेहमी आहात, असा विश्वास तुमच्या बोलण्यातून दाखवा.
  • पत्नीला ज्या गोष्टी करायला आवडतात, त्या करू द्या. त्यांच्यावर कधीही बंधने लादू नका. लग्नानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे, अशी तिला चुकूनही जाणीव होऊ नये. तिचा मनापासून आदर करा.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader