Vomiting while travelling:  आपल्या सर्वांनाच फिरायला आवडते पण प्रवास करताना बस, ट्रेन किंवा विमानाने लांबचा प्रवास काहींना जमत नाही. मळमळ, उलटी होणे यांसारख्या समस्यांमुळे अनेक जण इच्छा असूनही प्रवास करणे टाळतात. तुम्हीही यापैकीच असाल तर काळजी करु नका. आणि तुमची ट्रिप अजिबात रद्द करु नका. कारण आम्ही तुमच्यासाठी प्रवासादरम्यान उलट्या किंवा चक्कर येण्याचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आणले आहेत. इथून पुढे नेहमी प्रवास करताना या दोन गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. तुमची ट्रिप एकदम मस्त होईल. आणि तुम्हाला ट्रिपचा पुरेपूर आनंदही लुटता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैद्यकीय भाषेत या आजाराला मोशन सिकनेस म्हणतात. मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. मोशन सिकनेसमुळे लोकांच्या प्रवासादरम्यान उलट्या थांबत नाहीत. मात्र तुम्हाला या त्रासापासून वाचवायचं असेल तर खाली दिलेल्या काही सोप्या टिप्स फॉलो करा.

घरगुती पावडर

प्रवासादरम्यान, तुम्ही एक घरगुती पावडर तयार करून ती तुमच्यासोबत ठेवा. ही पावडर कशी बनवायची जाणून घेऊयात. ओवा, बडीशेप आणि जिरे घ्या. ते मंद आचेवर भाजून घ्या, थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात पावडर बनवा. ही पावडर बाटलीत भरून किंवा हवाबंद डब्यात ठेवून प्रवास करताना सोबत घेऊ शकता.ही पावडर खाल्ल्यानंतर तुम्हाला उलट्या किंवा चक्कर अजिबात जाणवणार नाही. आणि यामुळे तुमची पोटाची समस्या दूर होईल आणि तुमचा मूडही फ्रेश राहील. या घरगुती पावडरचा वापर केल्यानंतर, तुम्हाला प्रवास करताना कोणताही त्रास होणार नाही.

हेही वाचा >> आला हिवाळा…तब्येत सांभाळा! थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं? जाणून घ्या

लवंगा भाजून घ्या

प्रवासात भाजलेल्या लवंगा सोबत ठेवा. लवंगा नीट भाजून घ्या, पावडर करा आणि हवाबंद डब्यात ठेवा. जेव्हाही तुम्हाला उलटी, मळमळ किंवा चक्कर येत असेल तेव्हा ही पावडर तोंडात टाका. यामुळे तात्काळ आराम मिळेल. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यासोबत काळे मीठ देखील घेऊ शकता. भाजलेल्या लवंगात काळे मीठ घातल्यास चव चांगली लागते. या दोन गोष्टींमुळे तुम्हाला पूर्ण आराम मिळेल. शिवाय तुम्हाला औषध किंवा इतर कशाचीही गरज भासणार नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to overcome the vomit sensation while travelling how to stop vomiting while travelling srk
Show comments