आंबट चव असणारे, भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व असणारे रसाळ लिंबू, या कडक उन्हाळ्यात आपली तहान शमविण्याचे काम उत्तमरीत्या करत असते. लिंबू सरबत, लिंबू पाणी, लिंबू सोडा अशा थंडगार पेयांनी रणरणता उन्हाळा काही क्षणांसाठी का होईना पण सुकर होतो. सरबतांपासून ते वेगवेगळ्या पदार्थांवर केवळ चवीपुरते पिळले जाणारे लिंबू, स्वतः मात्र कधीकधी कमी रसाळ निघते. तेव्हा मात्र, ‘बाजारात गेल्यावर भरपूर रस देणारे लिंबू कोणते हे कसे बरे ओळखायचे’? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. यांच्या काही भन्नाट आणि सोप्या टिप्स आज आपण पाहू. त्याआधी लिंबू आणि लिंबू वापरण्याचे थोडे फायदे पाहू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लिंबू वापरल्याचे फायदे

१. क जीवनसत्त्व मिळते

आपल्या आहारामध्ये, विशेषतः उन्हाळ्यात लिंबाच्या रसाचा उपयोग केल्याने शरीरास भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व मिळण्यास मदत होते. क जीवनसत्त्वात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करून, तुम्हाला किरकोळ संसर्गांपासून दूर ठेवण्यास फायदेशीर ठरू शकते.

हेही वाचा : भांडी घासताना तुम्हीही वापरताय गरम पाणी? जरा थांबा; स्वच्छ, चमकदार भांड्यासाठी पाहा ‘या’ Tips

२. पचनास मदत होते

लिंबामधील असणाऱ्या उपयुक्त घटकांमुळे, ते आपले पचन सुधारण्यास मदत करू शकते. सकाळी उठल्यावर लिंबू पाणी प्यायल्यास दिवसभर त्याचा फायदा होऊ शकतो.

३. त्वचेसाठी उपयुक्त

लिंबामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखे महत्त्वाचे घटक असतात, जे आपल्या त्वचेसाठी उपयुक्त असतात. त्यामुळे आहारात लिंबाचा वापर केल्याने, त्याचा फायदा शरीरासह त्वचेलादेखील होत असतो.

रसाळ लिंबू कसे ओळखावे?

लिंबाच्या रंगांवरून, कडक किंवा मऊपणावरून आणि वजनावरून लिंबू रसाळ असेल कि नाही याचा आपण अंदाज घेऊ शकतो. कसे ते पाहू.

१. लिंबू हाताला सुरकुतलेली लागत असतील अथवा लिंबांवर डाग असल्यास असे लिंबू निवडू नये. जे लिंबू चमकदार आणि डागविरहित असलतील असे लिंबू चांगले असू शकते. डागाळलेल्या अथवा सुरकुतलेली लिंबामध्ये रसाचे प्रमाण हे चमकदार लिंबाच्या तुलनेत कमी असते.

२. लिंबू विकत घेताना त्यांच्या वजनावर लक्ष द्यावे. लिंबू वजनाला हलके असल्यास ते विकत घेऊ नये. कारण वजनाला कमी असणाऱ्या लिंबामध्ये रसाचे प्रमाण कमी असते. मात्र, लिंबू वजनाला जड लागत असल्यास, तुम्ही असे लिंबू विकत घेऊ शकता. लिंबाचे वजन हे त्यामध्ये असणाऱ्या रासचे प्रमाण कमी-अधिक असल्याची माहिती देतात.

हेही वाचा : Kitchen tips : चांगली वांगी कशी विकत घ्यावी? बाजारात जाण्याआधी ‘ही’ ट्रिक पाहा! शेफने दिलाय सल्ला…

३. वजनासह, लिंबाच्या रंगाकडे लक्ष द्यायला अजिबात विसरू नका. आपल्या सर्वांनाच माहित आहे कि, लिंबू योग्य प्रमाणात पिकल्यानंतर त्यांना सुंदर असा पिवळा रंग प्राप्त होतो. त्यामुळे बाजारात लिंबांना हिरवे डाग असल्यास, अथवा लिंबू हिरवे असल्यास असे लिंबू शक्यतो विकत घेऊ नये. कारण, हिरव्या रंगाचे लिंबू हे पूर्णतः पिकून त्यांमध्ये भरपूर रस असलेच असे खात्रीशीर सांगता येत नाही. असे असले तरीही, प्रत्येक लिंबाच्या जातीनुसार त्यांच्या रंगात बदल होऊ शकतो, याची नोंद घ्यावी.

४. लिंबू हातात घेतल्यानंतर, बोटांच्या मदतीने ते लिंबू अतिशय हलक्या हाताने दाबून पाहावे. लिंबू हाताला टणक लागल्यास ते कोरडे किंवा कमी रसाचे असू शकते. याउलट लिंबू हलके दाबून पाहिल्यावर, ते अगदी हलके चेपले गेले तर ते लिंबू चांगले आणि रसदार असू शकते. कोरडे लिंबू हाताला शुष्क लागतात आणि ती व्यवस्थित चेपली जात नाहीत.

त्यामुळे लिंबाच्या लोणच्यासाठी किंवा सरबतासाठी बाजारात लिंबू घेण्यासाठी जात असाल, तेव्हा रसाळ आणि पिकलेले लिंबू अशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते.

[टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.]

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to pick perfect and juicy lemons in the market check out this simple useful kitchen tips in marathi dha