3 Ways to Pick a Good Mango : आंब्याचा सीजन सुरु झाला असून अनेकजण तो आवडीने खरेदी करत आहेत. मात्र आंबा खरेदी करताना अनेकांना गडबडायला होते. कारण वरून सुंदर, पिकलेला आंबा गोड असतो असे नसते. पण अनेकांना चांगला दिसणारा आंबा हा गोडच असतो असे वाटते. यात अनेकांना आंबा योग्य प्रकारे कसा ओळखून घ्यायचा हेच माहित नसते. यामुळे आंबा खरेदी करताना तुमची अनेकदा फसवणूक केली जाते, अशावेळी बाजारातील आंबा खरेदी करताना तो आतून गोड आहे की आंबट हे बाहेरून कसे ओळखायचे, याबाबत आम्ही तुम्हाला काही ३ सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.
आंबा गोड आहे की आंबट कसा ओळखायचा?
१) आंब्याच्या वरच्या भागातील देठाची जाडी पाहा.
सर्वप्रथम हातात एक आंबा घ्या आणि त्याच्या वरच्या बाजूला म्हणजे देठाजवळ पाहा. यावेळी देठ जर झाडाच्या खोडाप्रमाणे दिसत असेल, जाड असेल. तसेच ते देठ आंब्याच्या आतील बाजूस थोडे खोल गेले असेल आणि बाकीचा आंबा त्याच्या बाजूने थोड्या वरच्या बाजूस वाटत असेल तर तो आंबा चांगल्याप्रकारे पिकलेले आणि गोड असेल. पण आंब्याचा देठ वरच्या बाजूस दिसत असेल आणि आकाराने लहान असेल तर तो आंबा कोवळा असतो. हा आंबा पिकू शकला असता पण तो परिपक्व होण्याआधीच झाडावरून काढला त्यामुळे तो आता पिकला तरी गोड लागणार नाही.
२) आंब्याच्या तळाची बाजू पाहा.
आता आंब्याची तळाची बाजू तपासा, जर आंब्याची खालची बाजू काळी आणि गडद रंगाची किंवा कोरडी दिसत असेल तर याचा अर्थ ते फळ ताजे पिकलेले नाही. अशा आंब्यांवर खूप सुरकुत्याही दिसतात. आंब्याच्या तळाच्या बाजूने जर आंबा जास्त पिवळा आणि थोडासा हिरवा दिसत असेल तो आंबा खाण्यायोग्य असतो. पण एखाद्या आंबाच्या खालच्या बाजूस खूप सुरकुत्या दिसत असतील तो चवीला गोड लागत नाही.
३) आंब्याच्या सुगंधावरून ओळखा
तुम्ही आंबा आतून पिकला आहे की नाही हे थोड हकलं दाबूनही ओळखू शकता. हलके दाबल्यावर आंबा दाबला जात असेल तर तो आतून गोड लागेल. पण जास्त पिकलेल्या आंब्याची चवही खराब होते. याशिवाय गोड आंब्याचा एक वेगळाच सुंदर सुगंध येतो. गोड-गोड असा हा सुगंध जर नाकात जाणवला तर तो आंबा गोड आहे हे समजून जा. पण जास्त पिकलेला किंवा खराब झालेल्या आंब्यातून तुम्हाला व्हिनेगर किंवा थोडा तिखट वास देईल.
त्यामुळे या तीन गोष्टी समजून घ्या आणि आंबा खरेदी करण्यासाठी जा. आंब्याचा आकार रंगापेक्षा या तीन गोष्टींकडे लक्ष द्या. आंबा कोणताही असो, मग तो लहान असो वा मोठा. या तीन गोष्टी तुम्हाला योग्य प्रकारे ओळखता आल्या तर तुम्ही गोड, रसाळ आंबे खरेदी करु शकता.