Garlic Farming : लसूणचा उपयोग स्वयंपाकात आणि औषधींमध्ये केला जातो. लसूण फक्त जेवणाचीच चव वाढवत नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही तितकेच फायदेशीर आहे. शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीला लसणाची लागवड करतात.
आपण सहसा बाजारातून लसूण विकत आणतो, पण तुम्हाला माहिती आहे का, दररोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या लसणाची तुम्ही घरच्या घरी लागवड करू शकता. होय, प्लास्टिक बाटलीचा वापर करून तुम्ही लसणाची शेती करू शकता. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.
- सुरुवातीला पाण्याची प्लास्टिक बाटली घ्या. या बाटलीचे तोंड लहान असल्यामुळे ते कापावे, जेणे करून लागवड करण्यास सोपी जाईल.
- बाटलीत स्वच्छ माती टाका. मातीची गुणवत्ता चांगली असणे खूप गरजेचे आहे; तरच पुढे फायदा दिसून येईल. जर मातीत छोटे-मोठे दगड असतील तर रोपटे वाढणार नाही.
हेही वाचा : बाथरूमचा नळ गंजला आहे का? असा करा झटक्यात स्वच्छ, चमकेल चांदीसारखा!
- बाटलीत माती टाकल्यानंतर त्यावर लसणाच्या पाकळ्या टाका. लक्षात ठेवा की, लागवड करताना लसणाच्या पाकळीची मुळाकडील बाजू मातीच्या दिशेने लावावी आणि पाकळीची साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
- लसणाची पाकळी मातीत पेरल्यानंतर त्यावर पुन्हा माती टाकावी. दररोज थोडे थोडे पाणी टाकावे.
- काही दिवसातच तुम्हाला नवं रोपटं वर आलेलं दिसेल. या रोपट्याला नियमित थोडं थोडं पाणी द्या. अशाप्रकारे घरच्या घरी तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीचा वापर करून लसणाची लागवड करू शकता.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)