तुम्हाला दाक्षिणात्य खाद्यपदार्थ खायला आवडतात का? विशेषत: मेदू वडा, मग ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. खोबऱ्याची चटणी किंवा सांबरसह मेदू वडा खाण्याची मज्जा काही वेगळीच आहे. मेदू वडा खायला आवडतं असेल तर या लेखात आम्ही तुम्हाला मेदू वडा तयार करण्याची सोपी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही परफेक्ट मेदुवडा तयार करू शकता.

चविष्ट खादयपदार्थ खाणे सोपे असते पण ते तयार करणे तितकेच अवघड असते. मेदूवडा तयार करणे देखील तसे थोडे अवघड आहे आहे विशेषत: नव्याने स्वयंपाक शिकाणाऱ्यांसाठी. मेदूवड्याचे पीठ तयार करणे तसे सोपे आहे पण, तेलात मेदूवडा टाकताना त्याला हवा जसा आकार देता येत नाही. मेदूवडा हा गोलाकार असतो आणि त्याला मध्ये एक छिद्र असते. हातावर असे वडा तयार करणे जरा किचकट काम आहे, काहींना ते जमते पण काहींना मात्र जमत नाही. काहीजण मेदू वडा तयार करण्यासाठी यंत्र वापरतात ज्यात पिठ टाकले जाते आणि तेलात वडा सोडला जातो. हे यंत्र वापरून परफेक्ट मेदू वडा तयार करता येतो. पण तुमच्याकडे असे कोणतेही यंत्र नसेल आणि तुम्हाला हातानेही मेदूवडा तयार करता येत नसेल तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या मदतीन तुम्ही झटपट मेदूवडा तयार करू शकता तेही परफेक्ट आकाराचा.

if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Lucky bamboo plant care
बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी
Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
which is the best pillow for sleep snoring and pillow
तज्ज्ञांनी सांगितलेली ही उशी तुमचे घोरणे कमी करू शकते? जाणून घ्या…
Shocking video Man Sleeps On An Electricity Pole In Andhra Pradesh Shocking Video
VIDEO: देशी दारु अशी चढली की…तरुण थेट विजेच्या तारांवर जाऊन झोपला; पुढे जे घडलं ते पाहून व्हाल हैराण
crispy peas triangle recipe in marathi
Crispy Peas Triangle: नववर्षाच्या सुरूवातीला ट्राय करा मटारची ‘ही’ नवीकोरी रेसिपी, साहित्य आणि कृती घ्या लिहून

हेही वाचा – घरात तंदूर नाही? मग प्रेशर कुकरमध्ये बनवा ढाबा स्टाईल तंदुरी रोटी, जाणून घ्या जुगाड

चहाची गाळण वापरून तयार करा मेदू वडा

  • चहाची गाळण वापरून तुम्ही परफेक्ट मेदूवडा तयार करू शकता. ऐकायला विचित्र वाटेल पण ही ट्रिक एकदा वापरून पाहा.
  • चहाची गाळण घ्या आणि ती उलटी पकडा.
  • आता उलट्या गाळणीच्या जाळीवर तयार मेदूवड्याचे पीठ लावा.
  • पिठाच्या मधोमध एक छिद्र करा.
  • गाळण सरळ करून हलकेच वडा गरम गरम तेलात सोडा.
  • तुमचा परेफक्ट आकाराचा मेदू वडा तयार आहे.

हेही वाचा – अंडा तवा मसाला: झणझणीत अन् मसालेदार रेसिपी, एकदा खाऊन पाहा

सोशल मीडियावर या ट्रिकचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर seemassmartkitchen नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही ट्रिक स्वत: वापरून पाहू शकता.

Story img Loader