खरवस हा पदार्थ आपल्याकडे फार पूर्वीपासून बनवला जातो आणि तितक्याच आवडीने खाल्ला जातो. तुम्हाला जर खरवस माहित असेल तुम्हाला माहिती असेल की गायी की म्हशीच्या बाळपणांनंतर चिक मिळतो. पण चिक म्हणजे नक्की काय? जेव्हा एखादी गाय किंवा म्हैस वासराला जन्म देते तेव्हा पहिल्या तीन दिवसांपर्यंत मिळणाऱ्या दुधालाच(colostrum) चिक म्हणतात. हा चिक वापरून खरवस तयार केला जातो. खरवस हा अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असतो.

ज्यांच्याकडे गाय किंवा म्हैस असते त्यांना ताजा चिक मिळतो. दुध विक्रेत्यांना सांगितले तर त्यांच्याकडे जेव्हा गाय किंवा म्हैशी बाळंतपण होईल तेव्हा तो चिक आणून देतो. चिक मिळाल्यानंतर त्याची खरवस कशी तयार केली जाते हे तुम्हाला माहितीये का? माहित नसेल तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला सांगतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंस्टाग्रामवर सध्या खरवस रेसिपीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर iambhagyashrii या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा – मधुमेही व्यक्तींसाठी भात कसा शिजवावा? कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरावा? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या…

साहित्य
गायीचे दूध अर्धा लीटर ; गायीचा चीक अर्धा लीटर.
दोन वाट्या ऑर्गैनिक गूळाची पाउडर.
वेलदोडा , जायफळ पूड ( चवीप्रमाणे)
२/३ केशराच्या काड्या

हेही वाचा – Lazy Parenting म्हणजे आळशी पालक नव्हे! मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पालकत्वाची नवी संकल्पना

कृती
दुध आणि गायीचा चीक व्यवस्थित एकत्र करा.
त्याच गुळ टाकून एकत्र करा.
त्यात वेलदोडा आणि जायफळ पावडर टाका आणि एकत्र करून घ्या.
कुकरमध्ये पाणी तापवून घ्या. एका डब्यात पाणी घेऊन कुकरमध्ये ठेवा. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात तयार चिक दुसऱ्या डब्यात ओता आणि कुकरमध्ये ठेवा.
त्यात वरून २ आणि ३ केसरच्या काड्या टाका. कुकरची शिटी
इडलीच्या कुकरमध्ये पाणी टाकून किंवा एका पातेल्यात पाणी टाकून त्यात चिकाचे भांडे ठेवूनही शिजवू शकता.
काही वेळानंतर खरवस शिजला आहे का ते तपासा. त्यासाठी एक चाकू मिश्रणात टाकून बाहेर काढा.
चाकू साफ असेल तर खरवस शिजला आहे. जर त्याला मिश्रण लागले तर आणखी काही वेळ शिजू द्या.
गोड चविष्ट खरवसचा आस्वाद घ्या.