टोमॅटो ही अशी एक भाजी आहे, जी बहुतेक सगळ्या प्रकारच्या जेवणात वापरली जाते. भाजी कोरडी असो किंवा ग्रेव्ही त्यात टोमॅटो हा असतोच. दररोज लागणाऱ्या या टोमॅटोची किंमत कधी १० रुपये ते १५ रुपये प्रति किलो देखील होते. अशा वेळी जेव्हा टोमॅटोची किंमत ही कमी असते तेव्हा त्याचा साठा का करू नये? आपल्याला वाटतं की टोमॅटो २-४ दिवसात खराब होतात, तर मग त्याचा साठा कसा करू शकतो. चला तर जाणून घेऊया टोमॅटोची प्युरी बनवून त्याला वर्षभर ठेवण्याची ट्रिक…
टोमॅटोची प्यूरी जवळपास प्रत्येक भाजीत वापरतात. जर तुम्ही एकदा टोमॅटो प्यूरा बनवली तर ती तुम्ही वर्षभर वापरू शकतात.
यासाठी आपल्याला एक किलो टोमॅटो, मीठ, साखर आणि थोडं पाणी पाहिजे.
आणखी वाचा : पीठ मळताना ही ट्रीक नक्की वापरा, पोळी फुलल्याशिवाय राहणार नाही
सगळ्यात आधी टोमॅटोला दोन छोटे चीर करा. हे चीर जास्त खोल नसले पाहिजे आणि टोमॅटोच्या खालच्या भागात असले पाहिजे. यामुळे टोमॅटोचे साल काढायला सोपे होईल.
आता मोठ्या भांड्यात गरम पाणी करा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात टोमॅटो २-३ मिनिटांसाठी ठेवा. टोमॅटो थंड झाल्यानंतर त्यांना बाहेर काढा आणि त्याचे साल काढा.
आणखी वाचा : मैदा, बेसन आणि पीठाला कीडं लागत असेल तर करा ‘या’ गोष्टी
यानंतर टोमॅटोला कापून मिक्सरमध्ये टाका आणि त्याची पेस्ट तयार करा. एक गाळणी घ्या आणि ही पेस्ट गाळून घ्या.
या प्यूरीला पुन्हा एकदा गॅसवर ठेवा. उकळी आल्यावर यात मीठ आणि साखर घाला. यामुळे टोमॅटोची प्यूरी खराब होणार नाही.
आणखी वाचा : किसून की ठेचून? आल्याचा कडक चहा बनवण्याची योग्य पद्धत
ही टोमॅटो प्यूरी जास्त काळ टिकवण्यासाठी आइसट्रे मध्ये ठेवा. आता तुम्हाला जेव्हा भाजी बनवताना टोमॅटो प्यूरी लागेल तशी तुम्ही वापरू शकतात.