सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर डेंग्यूची साथ चालू आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंगला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर याच तापामुळे बॉलीवूडचे आघाडीचे दिग्दर्शक यश चोप्रा यांचे गेल्यावर्षी निधन झाले. मुंबईत डेंग्यूने त्रस्त झालेले अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी आपल्याला काळजी घेण्याची गरज असून, सौम्य संसर्गजन्य ताप, हिवताप, तीव्र डोकेदुखी, तीव्र वेदना ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जा. याबाबतचा निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. डेंग्यूसारख्या आजारात उपचाराबरोबरच महत्वाचे ठरतात ते प्रतिबंधात्मक उपाय.
१. डासांना आळा घालणे. घरात डासांचा शिरकाव होऊ नये याकरिता योग्य ती काळजी घ्या.
२. घराच्या आजुबाजूला पाणी साठू न देणे. वेळ्च्यावेळी साठलेले पाणी रिकामे केल्यास डासांना प्रतिबंध घालता येऊ शकतो.
३. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते.
४. फ्लॉवर बेड, कुलरमध्ये पाणी वेळच्यावेळी बदला आणि त्यांची वेळेवर साफसफाई करा.
५. पाण्याचे भांडे झाकून ठेवा.
५. डेंग्यूचे डास ओलसर भागात अधिक प्रमाणात असल्याने अशा ठिकाणी जाणे टाळा.
सध्यातरी डेंग्यूवर वैद्यकीयदृष्टय़ा मान्यताप्राप्त अशी लस उपलब्ध नाही. अ‍ॅस्टरच्या सिंगापूर इम्युनॉलॉजी नेटवर्कमध्ये डेंग्यूच्या विषाणूला मारण्यासाठी एक नवीन वैद्यकीय दिशा सापडली आहे त्यानुसार या विषाणूची यजमान व्यक्तीच्या प्रतिकारशक्ती प्रणालीत लपवण्याची क्षमता नष्ट करता येऊ शकेल. डेंग्यूच्या विषाणूला एमटेस या वितंचकाची गरज असते. त्याच्या मदतीने तो त्याचे जनुकीय घटक रासायनिकदृष्टय़ा अशा पद्धतीने बदलतो ज्यामुळे त्याचा शोध घेणे अवघड जाते. त्यामुळे या विषाणूत हे एमटेज वितंचकाला निष्प्रभ करण्याच्या वेगळे जनुकीय परिवर्तन घडवून आणले जाते. त्यामुळे प्रतिकारशक्ती प्रणालीचा योग्य तो प्रतिसाद मिळतो, परिणामी हा विषाणू परिणाम करू शकत नाही. एमटेज वितंचक कमकुवत केलेल्या विषाणूच्या मदतीने केलेल्या प्रयोगात असे दिसले की, अशा पद्धतीचा विषाणू एडिस डासांमध्येच टिकाव धरू शकत नाही तसेच तो या डासांमध्ये आपल्या आवृत्त्या तयार करू शकत नाही. पर्यायाने डास चावल्याने त्याचा प्रसार माणसात होऊ शकत नाही. त्यामुळे एमटेज उत्परिवर्तित डेंग्यू विषाणू हा लस तयार करण्यास सुरक्षित आहे व त्याच्यापासून डेंग्यूच्या विषाणूचे एकूण जे चार प्रकार आहेत त्यांच्यापासून संरक्षण मिळू शकते. सिंगापूरच्या नोवार्तिस इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल डिसीजेस व बीजिंग इन्स्टिटय़ूट ऑफ मायक्रोबायॉलॉजी अँड एपिडिमिऑलॉजी या संस्थांच्या सहकार्याने हे प्रयोग करण्यात आले असून आता लस तयार करण्याचे अंतिम काम बाकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा