Winter Health Tips : हिवाळ्यातील धुके, वातावरणात होणारे बदल, प्रदूषण या कारणांमुळे तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. वातावरणातील या बदलामुळे दमा किंवा श्वासाशी निगडित आजार असणाऱ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज असते, इतकेच नाही तर अशा समस्या नसणाऱ्यांना देखील नव्याने काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशावेळी काही पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास ते हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी मदत करू शकतात, कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आले
आल्यामध्ये अँटी- इन्फ्लॉमेंटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. बॅक्टेरिया, व्हायरस यांमुळे हिवाळ्यात बाळावणाऱ्या आजरांपासून वाचण्यासाठी आले नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

बदाम
बदामामध्ये मॅग्नेशियम, प्रोटीन, झिंक असे अनेक गुणधर्म आढळतात. तसेच यामध्ये विटामिन ई मुबलक प्रमाणात आढळते. विटामिन ई रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि व्हायरस, बॅक्टेरियांपासून संरक्षण करण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे हिवाळ्यात दररोज बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

High Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ सवयी करतात मदत

तुळशीची पाने
तुळशीची पाने देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर मानली जातात. तसेच तुळशीच्या पाने श्वसन संस्था आणि फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.

हळद
हळद हे प्रत्येक स्वयंपाक घरात उपस्थित असणारा गुणकारी पदार्थ आहे. यामध्ये अँटीइन्फ्लामेंटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. हळदीचा रोजच्या जेवणात समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यासह हिवाळ्यात सतत घशाची खवखव होते, यावर देखील हळद गुणकारी औषध मानले जाते.

लसूण
लसूण विटामिन सी, विटामिन बी, झिंक, फोलेट यांचे उत्तम स्त्रोत मानले जाते. लसणामध्ये अँटिव्हायरल, अँटिबॅक्टरियल, अँटीइंफ्लॉमेंटरी गुणधर्म आढळतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच सर्दी, खोकला अशा हिवाळ्यात सतत होणाऱ्या त्रासावर लसूण गुणकारी औषध मानले जाते. त्यामुळे हिवाळ्यात लसणाचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरेल.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to prevent winter illness these food will difinately make you prepare for this season pns