अनेकदा कपडे धुताना रंग जाण्याची भीती असते. अशावेळी आपण कापड चांगला नाही म्हणत कपड्यांना दोष देतो पण अनेकदा आपल्या कपडे धुण्याची पद्धत सुद्धा तितकीच जबाबदार असते. जर कपडे धुताना रंग जात असेल तर टेन्शन घेऊ नका. फक्त हे घरगुती उपाय करा.

अति प्रमाणात डिटर्जंटचा वापर टाळावा

डिटर्जेंटमध्ये केमिकलचा वापर अधिक केला जातो. कपडे धुताना कमी प्रमाणात डिटर्जंट वापरावे कारण डिटर्जंट पावडरचा जास्त वापर केल्यामुळे कपड्यांचा रंग जाण्याची शक्यता अधिक असते.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra winter updates
स्वेटर, शॉल शोधलीत का…? कारण, उद्यापासून हुडहुडी…
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार

कपडे सुकवताना ही काळजी घ्यावी

अनेकदा आपण चुकीच्या पद्धतीने कपडे सुकवतो. अनेकजण धुतलेले कपडे पिळून थेट उन्हात सुकवतात, पण हे चुकीचे आहे. असे केल्यामुळे कपड्यांचा रंग जातो. त्यामुळे कपडे धुतल्यानंतर कपडे जास्त पिळू नये आणि उन्हात कपडे टाकताना कपडे उलटे करुन टाकावेत. यामुळे कपड्यांचा रंग जात नाही.

गरम पाण्याने कपडे धुवू नये

कपडे धुण्यासाठी अनेकजण गरम पाण्याचा वापर करतात पण यामुळे रंग जाण्याची शक्यता अधिक वाढते. कपडे धुताना नेहमी थंड पाण्याचा वापर करावा.

जास्त वेळ कपडे भिजवून ठेवू नये

अनेक लोक तासन् तास कपडे भिजवून ठेवतात पण चुकूनही जास्त वेळ कपडे भिजवून ठेवू नये. असे केल्यामुळे कपड्यांचा रंग जाऊ शकतो आणि कपड्यांना दुर्गंधी येऊ शकते. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ कपडे भिजवून ठेवू नये.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे