How To Protect Room From Heat Naturally : उन्हाच्या झळा सध्या तीव्र होत आहेत. वाढत्या तापमानामुळे सगळेच हैराण झाले आहेत. त्यामुळे अनेक घरांत आता थंड हवेसाठी एसीचा वापर केला जातोय. पण, सर्वांत वरच्या मजल्यावर घर असल्याने दुपारच्या वेळी खूप उकडतं. अशा वेळी दुपारच्या वेळी थंडाव्यासाठी कोणते उपाय करता येतील ते समजत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही उकाड्यापासून आराम मिळवू शकता. त्यामुळे तुमचे एसीमुळे वाढणारे वीज बिलाचेही पैसेही वाचतील आणि घरात थंडावाही अनुभवता येईल.
उन्हाळ्यात घरात थंडावा निर्माण करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
१) व्हेंटिलेशनकडे लक्ष द्या
जर तुमच्या घरातील व्हेंटिलेशन चांगले असेल, तर घरात गरम हवा जास्त काळ राहणार नाही. व्हेंटिलेशनसाठी तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्या सकाळी आणि संध्याकाळी उघड्या ठेवू शकता. घरात जास्त उष्णता जाणवू नये यासाठी तुम्ही खिडक्यांना पडदे लावू शकता. जर तुम्हाला घराचा लूक वाढवायचा असेल, तर तुम्ही पडद्यांऐवजी ब्लाइंड्सदेखील वापरू शकता.
२) बाल्कनीत शक्य तितकी रोपे लावा
जर तुम्ही इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहत असाल, तर बाल्कनीत किंवा खिडक्यांमध्ये जास्तीत जास्त रोपे लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे उष्णता बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. घरात थंडावा निर्माण करण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यात थंडावा निर्माण करणारी रोपे लावू शकता. त्याशिवाय घर थंड करण्यासाठी तुम्ही काही घरांतर्गतची रोपेदेखील लावू शकता.
३) पाण्याने फवारणी करा
घर थंड ठेवण्यासाठी तुम्ही छतावर पाण्याची फवारणी करू शकता. सकाळी आणि संध्याकाळी पाण्याची फवारणी केल्यास तुम्हाला आपोआप सकारात्मक परिणाम जाणवू लागतील. जर तुम्हाला तुमच्या घरात उष्णता येऊ नये असे वाटत असेल, तर तुम्ही हँडक्राफ्टेड कूलिंग पडदेदेखील वापरू शकता. या टिप्स फॉलो करून तुम्ही घरात नैसर्गिकरीत्या थंडावा निर्माण करू शकता.