How to protect Smartphone in Rainy Season: स्मार्ट फोन आपल्या रोजच्या आयुष्यातील महत्त्वाचा हिस्सा आहे. क्वचितच एखादे काम असेल जे फोनशिवाय पूर्ण होत असेल. मग भलेही पर्सनल असो की ऑफिसचे काम असो. यामुळे कॉल, इमेल, सोशल मीडिया आणि एंटरटेनमेंटच्या सर्व गरजा स्मार्टफोनमुळे पूर्ण होतात. तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये स्मार्ट फोन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करता. पण पावसाळ्यामध्ये तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवणे अत्यंत अवघड काम आहे. स्मार्टफोन पाण्याच्या संपर्कात आल्यास खराब होऊ शकतो त्यामुळे पावसाळ्यात त्याला पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी खूप कसरत करावी लागते. पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही स्मार्ट फोन पावसाळ्यात सुरक्षित ठेवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोनला वॉटरप्रुऱ कव्हर लावून ठेवा

स्मार्टफोन पावसामध्ये किंवा स्विमिंग करताना भिजू शकतो अशी भिती तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही टीप्स घेऊन आलो आहो. स्मार्टफोन पाण्यापासून वाचवण्यासाठी वॉटर प्रुफ कव्हर वापरू शकता. हा कव्हर पाणी आणि ओलव्यापासून स्मार्टफोनला सुरक्षित ठेवण्यासाठीच डिझाईन केले आहे. तुम्हाला जर तुमचा फोन खराब होऊ नये असे वाटतं असेल तर वॉटर प्रुफ कव्हर वापरा.

हेही वाचा – खराब सोफा साफ करण्यासाठी ‘ही’ सोपी ट्रीक वापरा, काही मिनिटांमध्ये नव्यासारखा चमकू लागेल

हवा बंद बॅगमध्ये ठेवा

जेव्हा तुम्ही पावसामध्ये बाहेर जाणार असाल तर अशा परिस्थितीमध्ये फोन हवा बंद बॅगेत ठेवा. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल करी बॅगेत फोन ठेवल्यानंतर तुमचा फोन कसा वापरता येईल? महत्त्वाचे कॉल आणि मेसेज कसे मिळतील तर त्यासाठी मार्केटमध्ये पारदर्शक वॉटरप्रुफ मोबाईल पाऊच मिळतात. तुम्ही असे पाऊच खरेदी करू शकता. त्याची किंमतही फार जास्त नसते.

हेही वाचा – पावसाळ्यात शूज-चप्पल भिजण्याचे टेंन्शन आता विसरा, सुकवण्यासाठी फक्त ‘हे’ ५ हॅक्स वापरा!

IP67/IP68 रेटिंग फोन खरेदी करा

असे अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये आले आहेत, जे तुम्ही पाणी, शॉवर, स्विमिंग अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकता. यासाठी, स्मार्टफोनमध्ये IP67/IP68 रेटिंग दिली जाते, ज्यामध्ये पाणी आणि धूळ संरक्षण उपलब्ध आहे. त्याच्या मदतीने तुमचा फोन पावसात सुरक्षित राहील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to protect smartphone safe in the rainy season learn simple safety tips snk
Show comments