आजकाल मुलांचे संगोपन करणे इतके सोपे नाही. पालकांना आपल्या मुलांच्या संगोपनाची काळजी नेहमीच असते. आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न पालक करतात. मात्र इंटरनेटच्या युगात चुकीच्या संगतीचा परिणाम मुलांवर लगेच होऊ शकतो, त्यामुळे सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मुलांना वाईट मित्रांपासून वाचवण्यासाठी पालक काय करू शकतात ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • मुलांना जास्त वेळ द्या

मुलांच्या चांगल्या संगोपनातील पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना शक्य तितका वेळ देणे. यामुळे तुमचे आणि मुलाचे नाते अधिक घट्ट होईल आणि ते तुमच्यासोबत मनमोकळेपणाने बोलू शकतील.

मंदिरात घंटा वाजवण्याचे खरे कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या याची वैज्ञानिक बाजू

  • मुलांशी मैत्री करा

कोणतीही व्यक्ती, मग तो लहान असो वा मोठा, तो आपले रहस्य अशा लोकांसोबत शेअर करतो ज्यांच्याशी त्याची चांगली मैत्री आहे. जर तुम्ही मुलाचे मित्र म्हणून राहिलात, तर तो बिनदिक्कतपणे त्याची गोष्ट तुम्हाला सांगू शकेल. तसेच त्याला कोणत्याही परिस्थितीत तुमच्याबद्दल अस्वस्थता वाटणार नाही.

  • मुलांसोबत खूप कठोर वर्तणूक करू नका

असे म्हणतात की पालकांच्या कठोर स्वभावामुळे मूल खोटे बोलण्याकडे वळू लागते. मुलं निरागस असतात, त्यामुळे बहुतेक प्रसंगी भावनिक भूमिका घ्या. जर तुम्ही त्याला प्रत्येक गोष्टीवर फटकारले तर तो त्याच्या गोष्टी तुमच्यापासून लपवू लागेल आणि ओरडा मिळण्यापासून स्वत: ला वाचवण्यासाठी खोटे बोलू लागेल.

फ्लश करताना टॉयलेट सीटचे झाकण बंद ठेवावे की उघडे? संशोधनातून समोर आली माहिती

  • मुलांच्या सर्वच गोष्टींना मनाई करू नका

कोणत्याही मुलाची काही इच्छा असेल तर ते प्रथम आपल्या पालकांना सांगतात. अनेक वेळा आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यावर विश्वास ठेवत नाही. अशा स्थितीत मूल हट्टी होऊ लागते आणि तुमच्यापासून दुरावते. मुलाच्या काही न्याय्य मागण्या मान्य केल्या पाहिजेत, पण जर त्याला काही वाईट गोष्टीची इच्छा असेल तर थेट नकार देण्याऐवजी त्याला नीट समजावून सांगा, मग तो तुमचे म्हणणे ऐकेल.

  • मुलाच्या मित्रांबद्दल माहिती मिळावा

तुमच्या मुलाचे मित्र आणि चांगले मित्र कोण आहेत याची तुम्हाला पूर्ण जाणीव असली पाहिजे. तुमचे मूल कोणत्या लोकांच्या संगतीत आहे, हे जर तुम्हाला माहित असेल, तर तुम्ही मुलांना चुकीच्या संगतीत पडण्यापासून रोखू किंवा वाचवू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to protect your children from bad company these parent tips will help pvp