भारतातील कोरोना व्हायरसचे संकट अजून संपलेले नाही आणि याच दरम्यान तापाशी संबंधित एक नवीन आजार मंकीपॉक्स समोर आला आहे. एका वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून केरळला परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे. भारतातील मंकीपॉक्सच्या या पहिल्या प्रकरणामुळे देशात चिंतेचे वातावरण आहे आणि सरकारने हा आजार रोखण्यासाठी उपाययोजनांना वेग दिला आहे. कोरोना महामारीनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंकीपॉक्स विषाणू कसा पसरतो?

मंकीपॉक्स रोगाचा विषाणू ‘फ्लेविविरिडे विषाणू’ कुटुंबातून येतो आणि हा रोग माकडांपासून मानवांमध्ये पसरू शकतो. बाधित व्यक्ती कायसनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) या आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे, ज्याला ‘मंकी फिव्हर’ असे म्हणतात. मंकीपॉक्स हा प्राण्यापासून माणसात आणि नंतर माणसापासून माणसात पसरू शकतो.

Photos : मुलींना आईकडून वारशामध्ये मिळते Anxiety; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मंकीपॉक्स विषाणूमुळे होणाऱ्या गंभीरतेबद्दल चेतावणी दिली आहे आणि म्हटले आहे की या आजारामध्ये त्वचा संक्रमण, न्यूमोनिया, भ्रम आणि डोळ्यांच्या समस्यांचा समावेश आहे. मंकीपॉक्सची सुरुवातीची लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, लिम्फ नोड्स सुजणे, थंडी वाजणे आणि थकवा येणे. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर पुरळ उठते आणि याची सुरुवात चेहऱ्यापासून होते, जी सहसा संसर्ग झाल्यानंतर ६-१३ दिवसांनंतर दिसू लागते.

रात्री प्रकाशात झोपण्याची सवय ठरू शकते अनेक आजारांचे कारण; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

मंकीपॉक्सपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?

  • अलीकडेच व्हायरसचे निदान झालेल्या किंवा ज्यांना संसर्ग झाला असेल अशा लोकांच्या संपर्कात येणे टाळा.
  • जर तुम्ही लक्षणे असलेल्या एखाद्याच्या जवळच्या संपर्कात असाल तर फेस मास्क घाला.
  • शारीरिक संबंध ठेवल्यास कंडोमचा वापर करावा.
  • व्हायरस वाहून नेणाऱ्या प्राण्यांच्या संपर्कात येणे टाळा. यामध्ये आजारी किंवा मृत प्राणी आणि विशेषत: ज्यांना संसर्गाचा इतिहास आहे, जसे की माकडे, उंदीर आणि कुत्रे यांचा समावेश आहे.

Health Tips : सकाळी नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी प्या गरम पाणी; मिळतील ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे

  • आपले हात साबणाने आणि पाण्याने धुवा किंवा अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरा.
  • पुष्टी किंवा संशयित मंकीपॉक्स संसर्ग असलेल्या रूग्णांची काळजी घेताना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे वापरा.
  • फक्त पूर्णपणे शिजवलेले मांस खा.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to protect yourself from monkeypox know the symptoms and remedies precautions pvp