BoycottMaldives : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला नुकतीच भेट दिली आणि तेथील सुंदर समुद्रकिनाऱ्याची केली. त्यांच्या लक्षद्वीप भेटीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आहे तेव्हापासून प्रत्येकाला लक्षद्वीपला भेट देण्याची इच्छा होत आहे.
तुम्हाला समुद्राच्या लाटांच्या आवाजाचा आनंद घ्यायचा असेल आणि नैसर्गिक सौंदर्यात हरवायचे असेल तर मग लक्षद्वीप हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे! हा द्वीपसमूह अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे, जिथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात. पण लक्षद्वीपला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? तिथे कसे पोहोचायचे? आणि तिथे काय पहावे आणि काय करावे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
लक्षद्वीपला भेट देण्याची उत्तम वेळ: (Best time to visit Lakshadweep)
लक्षद्वीपमध्ये वर्षभर आल्हाददायक हवामान असते, परंतु लक्षद्वीपला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान मानला जातो. या काळात हवामान चांगलेदायक असते, जे प्रवासासाठी अतिशय आरामदायक असते. तसे, तुम्ही मार्च ते मे दरम्यान उन्हाळ्यातही लक्षद्वीपला जाण्याची योजना करू शकता. या काळात सर्व ठिकाणांना भेट देणे सोपे आहे.
हेही वाचा – Boycott Maldives का होतेय ट्रेंड? पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर भारतीयांनी का रद्द केला मालदीव दौरा
लक्षद्वीपला कसे जायचे (how to reach Lakshadweep)
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या लक्षद्वीपला फक्त जलवाहतूक किंवा विमानाने जाता येते. जहाजाने कोची ते लक्षद्वीप या रोमांचक प्रवासासाठी १४ ते २० तास लागतात. जर तुम्हाला लवकर पोहोचायचे असेल, तर तुम्ही कोचीहून अगात्ती विमानतळापर्यंत थेट विमानाने जाऊ शकता, जे लक्षद्वीपमधील एकमेव विमानतळ आहे. आगत्ती बेटावरून तुम्ही बोटीने मिनिकॉय बेट, काल्पेनी बेट आणि इतर बेटांवर जाऊ शकता. तुम्ही आगत्ती ते कवरत्ती बेटापर्यंत हेलिकॉप्टर राईडचा आनंद घेऊ शकता.
लक्षद्वीपमध्ये काय करावे (things to do in Lakshadweep)
लक्षद्वीपचे सुंदर समुद्रकिनारे आणि पाण्याखालील आश्चर्यकारक जीवन पर्यटकांना अनेक रोमांचक गोष्टींचा आनंद घेण्याची संधी देतात. स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग आणि समुद्राखाली चालणे (Undersea Walking) यांसारखे साहसी खेळ येथे करता येतात. इतकेच नाही तर पर्यटक येथे कयाकिंग, कॅनोइंग, जेट-स्कीइंग, काइटसर्फिंग आणि पॅरासेलिंगचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही बोटीने अनेक बेटांना भेट देऊ शकता आणि सर्व बेटांच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. लक्षद्वीपमधील डॉल्फिन पाहण्यासाठी अगात्ती आणि बंगाराम बेटे ही काही उत्तम ठिकाणे आहेत.
हेही वाचा – “अमानवी कृत्य!” कुत्र्याच्या पिल्लाला पाजली व्हिस्की; धक्कादायक घटनेचा Video Viral
लक्षद्वीपमध्ये कोणते अन्नपदार्थ खावे?(food to try in Lakshadweep)
लक्षद्वीपमधील खाद्यपदार्थांमध्ये केरळचा उल्लेख नक्कीच येतो! बहुतेक घरांच्या स्वयंपाकघरात मलबार खाद्यपदार्थ राज्य करतात. प्रत्येक डिशमध्ये थोडेसे खोबरेल तेल आणि कढीपत्ता नक्कीच जादू करतात. येथे तांदूळ हे मुख्य अन्न आहे, ज्यासह विविध प्रकारच्या सीफूडचा आनंद घेतला जातो. किलांजी नावाची अंडी आणि भाताची डिश लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात तयार केली जाते. मिनिकॉय बेटाचा प्रसिद्ध मूस कबाब हा टूना फिशपासून बनवला जातो. ऑक्टोपस फ्राय हा एक अनोखा पदार्थ आहे जो फक्त लक्षद्वीपमध्ये उपलब्ध आहे. सीफूड प्रेमींसाठी हे आश्चर्यकारक आहे! मास पोडीचथु, बटाला अप्पम, अवियल, बिर्याणी इत्यादी असे स्वादिष्ट पदार्थ आहेत, जे लक्षद्वीपच्या बहुतेक ठिकाणी सहज उपलब्ध आहेत.
लक्षद्वीपला भेट देण्यासाठी बजेट (Budget to visit Lakshadweep)
लक्षद्वीप टूर पॅकेज ४ दिवस आणि ४ रात्री सुमारे ₹ २३,0०४९ (प्रति व्यक्ती) पासून सुरू होते. मात्र हे पॅकेज लक्षद्वीपला पोहोचल्यानंतरच्या खर्चाचे आहे. लक्षद्वीपला जाण्यासाठी आणि तेथून परतण्यासाठी व्यवस्था तुम्हाला स्वतः करावी लागेल. कमी बजेटमध्ये लक्षद्वीपला जायचे असेल तर जहाजाने जाणे हा उत्तम पर्याय आहे. कोची ते लक्षद्वीप हा १४-२० तासांचा जहाज प्रवास २२००-५०००रु तर विमानाचे भाडे ५५०० रुपयांपासून सुरू होते.
हेही वाचा – रस्त्यावरून धावणाऱ्या कारमध्ये उभी राहून नाचतेय तरुणी; Video Viral पाहून नेटकऱ्यांमध्ये पेटला वाद
लक्षद्वीपला भेट देण्याआधी हे लक्षात ठेवा (Keep this in mind before visiting Lakshadweep)
लक्षद्वीपमध्ये प्रवेश प्रतिबंधित आहे आणि कोची स्थित लक्षद्वीप प्रशासनाने जारी केलेला परमिट आवश्यक आहे. परमिट मिळवण्यासाठी, तुम्ही आधी क्लिअरन्स सर्टिफिकेट डाऊनलोड करून तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनमधून क्लिअर करून घेणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्हाला ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचे तीन फोटोही सादर करावे लागतील. मंजुरी प्रमाणपत्रानंतर, तुम्हाला एंट्री परमिट डाउनलोड करावे लागेल किंवा विलिंग्डन आयलंड, कोची येथे असलेल्या लक्षद्वीप प्रशासन कार्यालयातून वैयक्तिकरित्या गोळा करावे लागेल. लक्षद्वीपला पोहोचल्यावर, तुम्हाला ही एंट्री परमिट लक्षद्वीपच्या स्टेशन हाउस ऑफिसरकडे जमा करावी लागेल.