How to choose the best jaggery: थंडीच्या दिवासात गुळाचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे विविध पदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो. गुळाच्या तुलनेत साखर आरोग्यासाठी फायदेशीर मानली जात नाही; त्यामुळे आरोग्याबाबत जागृक असणारे लोक साखरेऐवजी गुळाचा चहा पिणं पसंत करतात. मात्र, आजच्या काळात बनावट आणि रासायनिक गूळही बाजारात येऊ लागला आहे. अशा परिस्थितीत योग्य गूळ ओळखणे अत्यंत आवश्यक ठरते. यासाठी मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी तीन टिप्स दिल्या आहेत, ज्या लक्षात घेतल्यास चांगला गूळ अगदी सहज ओळखता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गूळ खरेदी करताना या तीन गोष्टींकडे लक्ष द्या

रंग

मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात की, जर तुम्ही बाजारात गूळ खरेदी करणार असाल तर आधी गुळाच्या रंगाकडे लक्ष द्या. बाजारात तुम्हाला दोन रंगीत गूळ दिसतील. यातील एक गूळ हलका सोनेरी आणि पांढरा रंगाचा असतो, तर दुसरा गूळ दिसायला काळा आणि गडद असतो.

मास्टरशेफने या दोघांपैकी सर्वात गडद काळ्या रंगाचा गूळ खरेदी करण्याची शिफारस केली आहे. त्यांच्या मते, हलका गूळ ब्लीच केलेल्या आणि रासायनिक प्रक्रिया केलेल्या गुळापासून बनवला जातो, तर गडद गूळ शुद्ध, भेसळ नसलेल्या उसाच्या रसापासून बनवला जातो. अशा परिस्थितीत गुळाचा रंग पाहून त्याची ओळख पटवा.

चव पाहा

पंकज भदौरिया सांगतात की, जेव्हाही तुम्ही गूळ खरेदी करायला जाल, तेव्हा त्याची चव घेऊन पाहा. गुळाची चव जरा खारट वाटत असेल तर जुना गूळ असू शकतो, म्हणून तो खरेदी करणे टाळा. गुळातील खनिजे कालांतराने खारट होतात, त्यामुळे खारटपणाची किंचितही जाणीव होणार नाही, असा गूळ खरेदी करा.

कडकपणा

या सर्वांशिवाय तुम्ही गूळ त्याच्या कडकपणावरूनही ओळखू शकता. पंकज भदौरिया यांच्या म्हणण्यानुसार, जर गूळ मऊ असेल आणि तुमच्या हातांनी तो सहज तुटत असेल तर याचा अर्थ त्यावर रासायनिक प्रक्रिया केली गेली आहे. शुद्ध, भेसळ नसलेला गूळ तोडायला कठीण असतो. अशा परिस्थितीत तुम्ही या सोप्या पद्धतीने चांगला गूळ ओळखू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to recognize adulterated jaggery follow these three tips for this sap