How to Reduce Body Heat In Summer : उन्हाळा सुरू झाल्यावर उष्माघात आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांत केवळ बाहेरील वातावरणच गरम नसते, तर आपले शरीरही आतून खूप गरम होते. जेव्हा आपले शरीर आतून गरम होते, तेव्हा आपल्याला थकवा, उष्माघात यांसारख्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा त्रास होऊ लागतो. तर, उन्हाळ्यात तुमच्याबरोबर असे होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचे शरीर आतून थंड ठेवू शकता.

आपण उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, जॅकेट, स्कार्फ, बांधून शरीराचे बाहेरून संरक्षण करतो. पण, शरीर आतून थंड ठेवणेही महत्त्वाचे आहे.

तर त्यासाठी काय उपाय आहेत ते चला जाणून घेऊ…

सतत पाणी आणि ज्यूस पित राहा- जर तुम्हाला या उन्हाळ्याच्या दिवसांत तुमचे शरीर थंड ठेवायचे असेल, तर तुम्ही सतत पाणी पित राहिले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांत नेहमीपेक्षा जास्त पाणी पिणे खूप महत्त्वाचे ठरते. इतकेच नाही, तर तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स असलेली हायड्रेटिंग पेयेदेखील पिण्यास सुरुवात केले पाहिजे. अशी पेये तुमचे शरीर आतून थंड ठेवण्यास मदत करू शकतात.

आंघोळीसाठी थंड पाण्याचा वापर करा- जर उन्हाळ्यात तुमचे शरीर आतून खूप गरम होत असेल, तर तुम्ही आंघोळीसाठी थंड पाण्याचा वापर करा. असे केल्याने तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. जर आंघोळ केल्यानंतरही तुम्हाला खूप गरम वाटत असेल, तर तुम्ही तुमचे मनगट, मान, कपाळ व पाय यांवर कूलिंग पॅकचा वापर करू शकता. असे केल्याने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळतो.

हायड्रेटिंग फळे आणि भाज्या खा- जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवायचे असेल, तर तुमच्या आहारात हायड्रेटिंग फळे आणि भाज्यांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात काकडी, कलिंगड आणि लिंबूवर्गीय फळांचा समावेश करता तेव्हा तुम्हाला उष्णतेपासून खूप आराम मिळतो.

हलके आणि सैल कपडे घाला- या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालता याचा तुमच्या शरीराच्या तापमानावर खोलवर परिणाम होतो. तुम्ही हलके आणि सैल कपडे निवडले पाहिजेत. तसे केल्याने तुमच्या शरीराचे तापमान वाढणार नाही आणि शरीर दिवसभर थंड राहील.