Face Fat Loss Tips : चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या वजनवाढीच्या अनेक समस्या समोर येत आहे. वाढलेलं वजन कसं कमी करावे, ही खूप मोठी समस्या असते. खूप प्रयत्न करुन किंवा डाएट करुन काही जण वजन कमी करता पण चेहऱ्यावरील अतिरीक्त चरबी मात्र कमी होत नाही. आज आपण चेहऱ्याची अतिरिक्त चरबी कशी कमी करायची, हे जाणून घेणार आहोत.
न्युट्रिशनिस्ट गुंजन यांनी या संदर्भात इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी चेहऱ्याची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी काही खास उपाय सांगितले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • कमी कॅलरीयुक्त आहार घेणे
  • जास्तीत प्रोटिनयुक्त आहार घेणे
  • चांगली झोप घेणे
  • भरपूर पाणी पिणे
  • पोटावरील चरबी कमी करणे

हेही वाचा : घटस्फोटामागील सामान्य कारणे कोणती? कोणत्या कारणांमुळे होऊ शकतो घटस्फोट? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात

dietitiangunjan यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चेहऱ्यावरील चरबी कशी कमी करायची? तुम्हाला पण खायला खूप आवडत असेल पण चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी पाहून तुम्ही खायला टाळता, तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
जर तु्म्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यावर दृढ राहा. एकदा तुम्ही वजन कमी करायला सुरुवात केली तर तुम्हाला आपोआप जॉ-लाइन बाहेर आल्यासारखे वाटेल.

जर तुम्ही सडपातळ असाल पण तुमची हनुवटी दुप्पट असेल तर जबड्याभोवती अतिरिक्त चरबी निर्माण होते पण या पाच टिप्सच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील चरबी कमी करू शकता.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे खरंय. या टिप्सने खरंच खूप मदत केली.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to reduce face fat tips helps you to get easily rid of unnecessary face fat ndj