Fix Spices In Curry: भारतीय लोकांनी तिखट पदार्थ खायला आवडतं असले तरी एका मर्यादेपेक्षा जास्त तिखट सर्वजण खाऊ शकत नाही. त्यामुळे स्वयंपाक करता कोणताही पदार्थाला चांगली चव यावी म्हणून त्यात मिरची, तिखट किंवा मसाले टाकले जातात. पण जर याचे प्रमाण चुकूनही जास्त झाले तर सर्व पदार्थाची चव बिघडते. जास्त तिखट असल्यामुळे कितीही चांगला चव असली तरी कोणी तो पदार्थ खाऊ शकत नाही. स्वयंपाक करता अशा चुका वारंवार होत असतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे भाजीतील तिखटपणा कमी होईल.
भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी सोपे उपाय
तूप
जर भाजीमध्ये कधीही तिखट जास्त झाले तर त्यात तूप टाका. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. ज्यामुळे तिखटपणा झटपट कमी होतो. हा कोणत्याही भाजीचा तिखटपणा कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.
हेही वाचा – ‘एचडीएल’ किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ कसे वाढवायचे? डॉक्टरांकडून जाणून घ्या सोपे उपाय
मलई
भाजीमध्ये जास्त लाल तिखट पडले तर सोपा उपाय म्हणजे त्यात मलई टाका. भाजी बनवताना किंवा नंतर तुम्ही मलई टाकू शकता. यामुळे भाजीला चांगली गेव्ही तयार होईल आणि भाजीची चव देखील सुधारेल.
लिंबाचा रस
जर तुम्हाला भाजीमध्ये तिखटासह मीठ देखील जास्त झाले असेल तर तुम्ही त्यात लिंबाचा रस वापरू शकता. त्यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होईल आणि जेवणाची चव देखील वाढेल.
हेही वाचा – साध्या कढईला Non Stick कसे बनवावे? जाणून घ्या सोपी ट्रिक, पाहा व्हायरल व्हिडीओ
पनीर
जर तुम्ही चुकून भाजीमध्ये तिखट जास्त टाकले तर त्यामुळे तुम्ही पनीरचे तुकडे किसून टाका. त्यामुळे भाजीला चांगली चव येते आणि तिखटपणा कमी होतो.
टोमॅटोची पेस्ट
भाजीमध्ये टोमॅटो पेस्ट टाकून तुम्ही भाजीचा तिखटपणा कमी करु शकता. तुमची भाजी घट्ट होईलच पण तिची चव देखील वाढेल.