Viral Video : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रिण राहणे, खूप गरजेचे आहे. जर रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त झाले तर त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. मधुमेहाच्या रुग्णांना तर गोड खाण्यास मनाई केली जाते. अनेक जण साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात गोड पदार्थांचे सेवन कमी करण्याचा विचार करतात पण खूप प्रयत्न करुनही आहारातील साखर कशी कमी करावी, हे अनेकांना कळत नाही. अनेक जण साखरेचे सेवन कमी करण्यासाठी गोड खाणे बंद करतात तर काही लोकांना काय खावे आणि काय खाऊ नये, हे सुद्धा कळत नाही. अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे.
सोशल मीडियावर अनेक न्युट्रिशनिस्ट आरोग्याशी संबंधीत माहिती देत असतात. या संदर्भात न्युट्रिशनिस्ट नुपूर पाटील यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नुपूर पाटील यांनी साखरेचे कमी सेवन कसे करायचे, याचे प्रभावी तीन प्रकार सांगितले आहेत. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
नुपूर पाटील यांनी पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे –
१. सर्व पॅक केलेले ड्रिंक्सचे सेवन करणे टाळा. या ऐवजी हर्बल चहा आणि भरपूर पाणी प्या.
२. खरेदी करा आणि फूड लेबल वाचा. केचअप सारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचे प्रमाण असते.
३. तुम्ही नियमित जितकी साखर खाता त्याऐवजी गूळ आणि मॅपल सिरप वापरा.
हेही वाचा : Jugaad Video : चहा नेहमी उतू जातो? मग हा भन्नाट जुगाड एकदा वापरा, चहा कधीही उतू जाणार नाही…
nupuurpatil या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन न्युट्रिशनिस्ट नुपूर पाटील यांनी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “साखरेचे कमी सेवन कसे करायचे? हे तीन प्रभावी मार्ग जाणून घ्या.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गूळामध्ये सुद्धा साखर म्हणून कॅलरीज असतात.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप चांगली माहिती दिली.” नुपूर पाटील इन्स्टाग्रामवर आरोग्याशी संबंधीत व्हिडीओ शेअर करत असतात. व्हिडीओच्या माध्यमातून त्या पोषक आहाराविषयी सल्ला देतात.