आपल्यापैकी अनेकांना ब्लॅकहेड्सच्या समस्येला तोंड द्यावे लागते. चेहऱ्यावरील मृत पेशींखाली तेल साचल्यामुळे आणि ते हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडायझेशन होऊन ब्लॅकहेड्स तयार होतात. ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो; पण अनेकदा उपाय करूनही काहीही फायदा होत नाही. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यानंतर ब्लॅकहेड्स तुम्ही झटक्यात घालवू शकता.

जिलेटिन मिक्स

ही खूप जुनी पद्धत आहे. त्यासाठी तुम्ही यात १:१ प्रमाणात दूध आणि जिलेटिन घ्यावे. ते १० सेकंदांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे. त्यानंतर हे मिश्रण ब्लॅकहेड्सवर लावून २० मिनिटांपर्यंत ठेवावे. कोरडे झाल्यानंतर ते काढावे. त्याबरोबर ब्लॅकहेड्ससुद्धा निघतात. १० दिवसांतून एकदा हा उपाय करावा.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
What Prakash Ambedkar Said?
Prakash Ambedkar : राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, अपशब्द वापरत म्हणाले, “ते आपल्याला..”
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

हेही वाचा : Heart Attack : ‘Sticky Cholesterol’मुळे कमी वयात हार्ट अटॅक येतो का ? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

कोथिंबीर पॅक

ताज्या कोथिंबिरीची पाने घ्या आणि ती व्यवस्थित धुवा. त्यात थोडी हळद आणि पाणी घालून कोथिंबीरची पेस्ट करा. हा मास्क ब्लॅकहेड्सवर लावा आणि रात्रभर ठेवा. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा हे करू शकता.

अंड्याचा पांढरा भाग

एक अंडे घ्या. अंड्याचा पांढरा भाग घेऊन, त्यात एक चमचा लिंबूचा रस टाका. हे मिश्रण ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी हे मिश्रण ब्रशने लावा आणि कोरडे पडल्यानंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा तुम्ही हा उपाय करू शकता.

हेही वाचा : कधी करावा सकाळचा नाश्ता? ९० टक्के लोकांना माहिती नाही; जाणून घ्या, योग्य वेळ कोणती?

दही फेस मास्क

या ब्लॅकहेड मास्कसाठी तीन चमचे ओट्सचे पीठ, दोन चमचे दही, एक चमचा ऑलिव्ह ऑईल व एक चमचा लिंबाचा रस एकत्र करा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट ब्लॅकहेड्सवर लावा आणि कोरडी झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा.

हळद आणि चंदन पॅक

अर्धा चमचा हळद पावडर, एक चमचा चंदन पावडर आणि त्यात थोडे दही मिसळून पेस्ट बनवा. ब्लॅकहेड्सवर ही पेस्ट लावा आणि २० मिनिटे ठेवा. त्यानंतर थोडे स्क्रब करा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय तुम्ही १५ दिवसांतून एकदा करू शकता.

हा उपाय करण्याच्या दोन मिनिटांपूर्वी कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि सॉफ्ट टॉवेलने पुसा. त्यामुळे ब्लॅकहेड्स अधिक सौम्य होऊन, ते घालवणे सोपे जाईल. तैलसर मेकअप कधीही करू नका आणि नेहमी सनस्क्रीन वापरा.