बऱ्याच जणांना अंडी खायला आवडतात पण त्याचा वास अजिबात आवडत नाही. कारण अंड्याचा वास इतका भयानक असतो की अनेकदा खाण्याची इच्छाही होत नाही. कित्येकदा अंडी उकडल्यानंतर किंवा तव्यावर अंडीच्या पोळी बनवल्यानंतर भांड्याला त्याचा वास येत राहतो. कितीही साफ केला तो वास पटकन जात नाही. अशावेळी काय करावे समजत नाही. पण आता काळजी करु नका आम्ही तुम्हाला भांड्यांना अंड्याचा येणारा वास दूर करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगार आहेत. ज्याच्या मदतीन तुम्ही एका धुण्यातच भांड्यांना येणार अंड्याचा वास पूर्णपणे काढू शकता.
भांड्यांमधील अंड्याचा वास दूर करण्यासाठी टिप्स
१) भांड्यातील अंड्याचा वास दूर करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम गरम पाणी आणि बेसन पीठाने स्वच्छ करा. यानंतर भांड धुवून त्यावर लिंबू चोळून पुन्हा पाण्याने धुवा.
२) अंड्याचा वास येणारं भांड व्हिनेगर, मिठाचे पाणी किंवा चहाच्या पाण्यात काहीवेळ भांड भिजवून ठेवा नंतर स्वच्छ धुवा. यासाठी तुम्हाला अंड्याचा वास येणाऱ्या भांड्यामध्ये चार ते पाच चमचे व्हिनेगर, मिठाचे पाणी किंवा चहा पावडरचे पाणी टाकून ठेवावे लागेल. मग थोड्या वेळाने ते भांडं स्वच्छ पाण्याने धुवावे लागेल. त्यामुळे अंड्याचा वास काही मिनिटांमध्ये गायब होईल.
३) भांड्यांना येणार अंड्याचा वास दूर करण्यासाठी त्यावर बेकिंग सोडा देखील उपयोगी येतो, यासाठी अंड्याचा वास येणारे भांड बेकिंग सोडा आणि डिशवॉशर घालून ते दहा मिनिटांसाठी तसेच सोडून द्या. यानंतर ते साबणाने घासून भांडी स्वच्छ करा.