How to remove facial hair at home : अनेक स्त्रिया आपले सौंदर्य जपण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. त्वचा मऊ, मुलायम दिसण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन हाता-पायांवरील केस काढण्यासाठी वॅक्सिन्ग करून घेतात. तसेच, चेहऱ्यावरील त्वचा नितळ दिसण्यासाठीही अनेकदा वॅक्स किंवा रेझरचा वापर केला जातो. मात्र चेहऱ्यावर अशा गोष्टींनी त्वचेला त्रास होऊ शकतो. त्वचा निब्बर आणि खरखरीत होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे होऊ नये यासाठी घरातील तांदळाचे पीठ आणि इतर गोष्टी तुम्ही खूप मदत करू शकतात. स्वयंपाकघरातील गोष्टींचा वापर करून, आपण घरच्याघरी वेदनारहित पद्धतीने चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढू शकतो. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते. अशा घसरगुती गोष्टी वापरुन आपण ४ मास्क कसे बनवायचे आणि कसे वापरयाचे हे पाहू.

हेही वाचा : Summer skin care : उन्हाळ्यात टॅन घालवण्यासाठी कोरफडीचा फेसपॅक कसा बनवायचा पाहा…

तांदळाचे पीठ आणि दुध

दोन चमचे तांदुळाचे पीठ एका बाऊलमध्ये घ्या. त्यामध्ये चमचाभर किंवा घट्ट पेस्ट तयार होई इतके दूध घालून दोन्ही गोष्टी एकत्र करून घ्या.
आता तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर ज्या ठिकाणी अनावश्यक केस आहेत, तिथे लावून घ्या.
पेस्ट लावल्यावर ५-१० मिनिटे हलक्या हाताने मसाज करून घ्या.
मसाज करून झाल्यावर ती पेस्ट चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या.
नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
हा उपाय तुम्ही आठवड्यातून २ किंवा ३ वेळेस करून शकता.
असे केल्याने चेहऱ्यावरील लव/ केस विरळ होण्यास मदत होऊ शकते.

तांदळाचे पीठ आणि हळद

२ चमचे तांदळाचे पीठ आणि एक चमचा हळद एका बाऊलमध्ये घ्या.
आता या दोन्ही गोष्टींची एक घट्ट पेस्ट तयार करण्यासाठी आवश्यक तेवढे गुलाब पाणी घालून, सर्व गोष्टी एकत्र मिसळून घ्या.
तयार झालेली पेस्ट, चेहऱ्यावरील अनावश्यक केस असणाऱ्या भागांवर लावून ठेवा.
१० ते १५ मिनिटानंतर हे पेस्ट कोरडी झाल्यानंतर, ती हाताने चोळून चेहऱ्यावरून काढून टाका.
आता कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यावर मॉइश्चराइझर लावा.
हा उपाय तुम्ही आठवड्यातून २ किंवा ३ वेळा करू शकता.

हेही वाचा : Skin care : नाकावरचे ब्लॅकहेड्स चुटकीसरशी होतील गायब! घरगुती पदार्थांचा असा करा वापर; टिप्स पाहा

तांदळाचे पीठ आणि पपई

पपईच्या काही फोडी कुस्करून, त्यामध्ये २ चमचे तांदळाचे पीठ एकत्र करून घ्यावे.
या मिश्रणात एक चमचा मध मिसळून घ्या.
तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर जिथे केस आहे त्या ठिकाणी लावून घ्या.
हा मास्क चेहऱ्यावर साधारण २० मिनिटे ते अर्धा तास तसेच ठेवून द्यावे.
त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
हा उपाय तुम्ही आठवड्यातून २ किंवा ३ वेळेस करू शकता.

तांदळाचे पीठ आणि अंड्याचा पांढरा बल्क

एक अंडे फोडून, त्याचा केवळ पांढरा भाग चांगला फेटून घ्या.
आता या फेटलेल्या अंड्यात २ चमचे तांदळाचे पीठ मिसळून पुन्हा मिश्रण फेटून त्याची एक पेस्ट तयार करून घ्या.
चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांच्या भागावर हे मिश्रण लावून घ्यावे.
आता १५ ते २० मिनिटांसाठी हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच ठेवावे.
मिश्रण वाळल्यानंतर, तो वाळलेला थर हलक्या हाताने काढून टाका.
कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा वापरून पाहू शकता.

[टीप – वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.]

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to remove facial hair at home try for natural remedies using rice flour dha