Mole home remedies : चेहऱ्यावर तीळ असणे हे सौंदर्याचे लक्षण मानले जात असले तरी चेहऱ्यावर खूप जास्त तीळ चांगले दिसत नाहीत. काही वेळा चेहऱ्याशिवाय पाठीवर किंवा हातावरही अनेक तीळ असतात, जे चांगले दिसत नाहीत. त्यांना काढून टाकण्यासाठी काही सौंदर्य उपचार आहेत परंतु ते साइड इफेक्ट्सचा धोका असतो . त्यामुळे तुम्ही काही सोपे घरगुती उपाय वापरून देखील ते हटवू शकतात. चला जाणून घेऊ या..

नारळाचे तेल

तीळ हटवण्यासाठी तुम्ही शरीरावर जिथे तीळ आहे तिथे नारळाचे तेल लावू शकता. हा उपाय नियमित केल्यास तीळ फिकट होऊन लागतो आणि हळू हळू नाहिसा होतो. तीळ हटवण्यासाठी हा उपाय हळू हळू काम करतो पण याचे कोणतेही दुष्परिणाम नाही.

no need to take
टेन्शन नै लेने का!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Garlic peel simple tips:
लसूण सोलायचा कंटाळा येतो? मग ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने दोन सेकंदांत सोला लसूण
These Spices Every Woman Should Have In Her Daily Diet
महिलांनो कायम चिरतरूण राहायचंय? मग “हे” मसाले तुमच्या रोजच्या आहारात असायलाच हवे; डॉक्टरांनी दिली माहिती
which food should not eat with curd
दह्याबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला विपरीत परिणामांचा धोका
Items in your kitchen that are linked to Cancer World Cancer Day 2025
महिलांनो कॅन्सरपासून वाचायंच असेल तर स्वयंपाक घरातील “ही” भांडी आताच बाहेर काढून टाका
how to get rid of shoe smell instantly
तुमच्या शूजमधून येणारी दुर्गंधी काही मिनिटांत होईल गायब, फॉलो करा फक्त ‘या’ ५ सोप्या टिप्स
diy mosquito repellent
आता विसरा डासांचा त्रास! दिवसेंदिवस वाढणाऱ्या डासांचा ‘या’ सोप्या आणि स्वस्त घरगुती उपायांनी करा नायनाट

बेकिंग सोडा आणि एंरडेल तेल

चेहऱ्यावरील नको असलेले तीळ काढून टाकण्यासाठी बेकिंग सोडा आणि एरंडेल तेल वापरू शकता. एक चमचा एंरडेल तेलामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकून मिश्रण तयार करा आणि ते शरीरावर जिथे तीळ आहे तिथे लावा. रात्रभर तसेच पाहू द्या. सकाळी ते साफ करा. हा उपाय काही दिवस नियमित करा. तीळ नाहीसा होईल.

हेही वाचा – डाळ शिजवताना कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येते? जाणून घ्या कुकर साफ करण्याचा सोपा जुगाड

लसून

नको असलेले तीळ हटवण्यासाठी लसून देखील चांगला उपाय ठरू शकतो. लसूनच्या काही कुड्या चांगल्या प्रकारे वाटून घ्या. ही पेस्ट तीळ असलेल्या ठिकाणी लावून पट्टीने बांधा. रात्र भर तसेच राहू द्या. सकाळी ते साफ करा

बटाटा

नको असलेले तीळपासून सुटका मिळवण्यासाठी बटाटा उपयोगी ठरू शकतो. बटाट्यामध्ये ब्लीच करण्याचे गुणधर्म असतात ज्यामध्ये तीळ नाहीसा होऊ लागतात. बटाट्याच्या चकत्या करता आणि ते तीळ असलेल्या ठिकाणी चोळा. काही दिवस हा उपाय केल्यानंतर तीळ पूर्णपण निघून जाईल.

हेही वाचा – व्हायरलपासून वाचण्यासाठी व्हिटॅमिन सी शिवाय ‘हे’ पोषक तत्वदेखील आहेत आवश्यक

मध

मधदेखील तील घालवण्यासाठी उपयूक्त ठरू शकते. एक चमचा मधामध्ये हळद टाकून १५ मिनिटे शरीरावरील तील असलेल्या ठिकाणी लावा. त्यानंतर कोमट पाण्यान साफ करा.

Story img Loader