पावसाळ्यात जवळपास प्रत्येक घरात ओलसरपणाची समस्या उद्धवते. कुठे कपडे सुकत नाही तर? कुठे भिंतीला ओल धरते, यात कुठे अनेकांच्या घरात पावसामुळे पत्र्यातून गळती सुरु होते. यात सर्वात भयंकर समस्या म्हणजे अंथरुणातून येणारा कुबट उग्र वास. हा वास इतका भयंकर असतो की, घरात स्वच्छता असली तरी तो येत राहतो. पावसात विशेषतः अंथरुणातील उशी- गाद्या ओलसर होता असल्याने त्यातील कापूस भिजून दुर्गंधी येऊ लागते. या दुर्गंधीमुळे रात्री आराम झोप लागत नाही, अशावेळी यापासून सुटका करण्याचे काही घरगुती उपाय जाणून घेणे आवश्यक आहे.

अंथरुणापर्यंत ओलसरपणा कसा पोहोचतो?

जर तुमच्या घरातील भिंतीवर किंवा मजल्यावर ओलसरपणा असेल, तर गादीला वास येणे खूप सामान्य आहे. तसेच जर घरात वेंटिलेशनसाठी जागा नसेल तरीही ही समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल, यावेळी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
last two days temperature in Mumbai increased and dew in atmosphere has reduced
मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था

१) अंथरुण हवेत सुकवा

ओलसरपणामुळे अंथरुणातून कुबट वास येत असेल तर ही अंथरुण दिवसातील काही तास उघड्यावर सुकत ठेवा. जर ऊन असेल तर अंथरुण थोडा वेळ बाहेर ऊन्हात ठेवा. यामुळे अंथरुणातील कुबूट वास कमी होईल, जर काही दिवस तुम्ही हा उपाय केल्यास अंथरुणातील कुबूट वास कमी होईल.

२) अंथरुणावर व्हॅक्यूमचा वापर करा

गादी किंवा गोधड्यांवर ओलसरपणामुळे लवकर धुळीचा थर जमा होतो, त्यामुळे त्यातून अधिकच उग्र वास येऊ लागतो. यावेळी तुम्ही व्हॅक्यूम मशीनचा वापर करु शकता.

जर व्हॅक्यूम मशीन नसेल तर तुम्ही धूळ काढण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा वापर करु शकता. यासाठी प्रथम गादीला एका दोरीवर ठेवा आणि आता पातळ काठीने गादीला धोपटा.

३) व्हिनेगरचा करा वापरा

अनेकजण स्वयंपाक घरात आणि साफसफाईसाठी व्हिनेगरचा वापर करतात. यामुळे गादीतील ओलसरपणा दूर करण्यासाठीही व्हिनेगर एक चांगला क्लिनिंग एजेंट मानला जातो. यासाठी एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर भरून गादीच्या दोन्ही बाजूंवर नीट शिंपडा.

४) बेकिंग सोड्याचा करा वापर

व्हिनेगर फवारल्यानंतर गादीवर कोरडा बेकिंग सोडा शिंपडा. १० ते ३५ तास असेच ठेवा, यानंतर गादी नीट झटका. व्हॅक्यूम मशीनने हे काम खूप सोपे होते. मात्र हा उपाय करुनही तुम्ही गादीतील उग्र वास कमी करु शकता.

Story img Loader