How To Remove Oil Stains From Clothes:अनेक महिला आपल्या साड्या जीवापाड जपतात, अगदी मोजक्याच प्रसंगाला या महाग ठेवणीतल्या साड्या नेसायला काढल्या जातात. आता खास प्रसंग म्हणजे जेवणखाणं, मेजवान्या असणारच. कधी उत्साहाच्या भरात, कधी अनावधानाने जेवणाच्या तेलाचे डाग तुमच्या साडीवर पडतात. एखाद्या महागड्या साडीवर जर डाग पडला तर जीव कसा तीळ तीळ तुटतो हे काही वेगळं सांगायला नको. तुमच्याकडूनही असं कधी झालंच तर आयत्या वेळी गोंधळ होऊ नये यासाठी आपण अगदी सोप्या टिप्स पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साडीवर तेलाचे डाग पडल्यास करा ‘हे’ उपाय

  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठलाही डाग पडला तर आधी पाण्याने धुवून काढण्याचा विचार करतो, असं अजिबात करू नका याने तेल पसरण्याचा धोका असतो.
  • तेलाचा डाग ज्या ठिकाणी पडलाय तिथे टॅल्कम पावडर, पीठ किंवा मैदा लावून पाहा हे पीठ सुकल्यावर त्यासह तेलाचा डाग निघून जाऊ शकतो.
  • बेकिंग सोडा व व्हिनेगरचे मिश्रण लिंबाच्या फोडीसह लावून पाहा
  • तेलाचा डाग काढण्यासाठी पांढरी शुभ्र टूथपेस्ट वापरून पाहा, पाणी न लावता टूथपेस्ट सुकू द्या व मग कोरड्या कपड्याने पुसून टाका.
  • पांढरी साडी किंवा कापड असल्यास ब्लिच वापरू शकता, रंग असल्यास ब्लिच वापरणे टाळा अन्यथा कापडाचा रंग पांढरा होऊ शकतो.
  • बोरिक पावडर लावूनही तुम्ही साडी स्वच्छ करू शकता.

हे ही वाचा<< Video: मशीनमध्ये शर्टची कॉलर स्वच्छच होत नाही? साबण, पावडर, ब्रश नव्हे तर ‘हा’ एकच उपाय करा

एक लक्षात घ्या. महागड्या साड्यांना नियमित कपड्यांना वापरला जाणारा साबण लावणे टाळा. कारण यामुळे फॅब्रिक खराब होण्याचा धोका असतो. तुम्हाला शक्य असल्यास ड्राय क्लिनिंग करून घ्यावा. किंवा अगदी सौम्य शॅम्पू वापरून हातानेच या साड्या पाण्यातून काढा, वॉशिंग मशीन वापरणे सुद्धा टाळावे. किंवा साडी स्वतंत्रपणे धुवावी जेणेकरून अन्य कपड्यांचा रंग साडीला लागणार नाही .

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to remove oil stains from clothes without using water how to dry clean saree at home smart tips svs