थंडीच्या दिवसात पायाला खूप घाम येतो. कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पायात दिवसातले किमान १२ तास तरी शूज असतात. संध्याकाळी जेव्हा माणूस घरी परततो आणि पायातले शूज काढतो तेव्हा त्यातून येणारी दुर्गंधीही अक्षरश: असह्य असते. सॉक्स घातले तरीही दुर्गंधी येतेचं. कार्यालयात शूज काढून वावरणं , तसंच रोज रोज शूज धूणं काही शक्य नसतं. अशावेळी ही दुर्गंधी घालवायची कशी? असा प्रश्न तुमच्यासमोरही असेलच म्हणूनच तुमच्यासाठी काही खास टिप्स. यामुळे तुमच्या शूजमधून येणारी असह्य दुर्गंधी नक्कीच कमी होऊ शकेल.

– दुर्गंधीचे प्रमाण कमी करण्यासाठी टी बॅगचा उपयोग होऊ शकतो. वापरलेल्या टी बॅग्स शूजमध्ये रात्री ठेवून द्याव्यात यामुळे दुर्गंधी खूप कमी होते.
– लिंबू किंवा संत्र्याची सालही शूजमध्ये ठेवल्यास दुर्गंधी खूप कमी होते.
– शूजमध्ये फॅबरिक फ्रेशनर शीटचे गोळे करून ठेवल्यासही लगेच फरक जाणवतो.
– काहीजण दुर्गंधी घालवण्यासाठी बेकिंग पावडरचा वापर करतात. रात्रभर थोडी बेकिंग पावडर शूजमध्ये शिंपडून ठेवावी, बेकिंग पावडर दुर्गंधी शोषून घेते.
– घामामुळे शूजमध्ये बॅक्टेरिया अधिक वाढतात त्यामुळे शूज शक्य असल्यास सुकवून घ्या किंवा आठवड्यातून एकदा तरी उन्हात ठेवा.