आपल्या चेहऱ्याची त्वचा, सुंदर, नितळ व स्वच्छ राहावी यासाठी आपण कितीतरी उपाय करीत असतो. कधी अमुक एक क्रीम लावतो, तर कधी कोणत्या तरी फेस मास्कचा वापर करतो. इतकेच नव्हे, तर हात आणि चेहऱ्यासाठी विशेष स्कीन केअर रुटीनदेखील असतात. असे सर्व काही करून आपण आपला चेहरा आणि हात व नखांची काळजी घेत असतो. परंतु, दिवसभर आपण घरात किंवा बाहेर फिरत असतो तेव्हा आपल्या पायांना सतत धुळीचा त्रास सहन करायला लागतो. उन्हापासून बचाव आणि रक्षण व्हावे म्हणून आपण जास्तीत जास्त बाहेर पडताना मोजे घालतो. बस! याउपर फार काही केले जात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बरेच जण त्यांचे पाय अन् पावलांची फारशी काळजी न घेण्याचे कारण हे कदाचित वेळ हे असू शकते. प्रत्येकाला दर वेळी पेडिक्युअर करणासाठी पार्लरला जायला जमेलच किंवा परवडेलच असे नसते. अशा वेळेस जर तुम्ही ही सोपी हॅक वापरलीत, तर तुमचा वेळही वाचेल आणि सोप्या घरगुती उपायाने पायांवरील टॅन निघून जाऊन, ते स्वच्छ व सुंदर दिसण्यास मदत होईल.

इन्स्टाग्रामवरील @ravleenbaggaofficial हॅण्डलरने सांगितलेल्या हॅकच्या वापराने, तुम्हाला सुटीच्या दिवशी घरातील या काही वस्तू वापरून, सहज पार्लरमध्ये केले जाते तसे पेडिक्युअर करता येऊ शकते. त्यासाठी काय करायचे ते पाहा.

घरगुती पेडिक्युअर

पाणी
बॉडी वॉश
इनो
कॉफी
साखर
दात घासायचा ब्रश
चंदन पावडर
दूध
मॉइश्चराइझर

हेही वाचा : जॉब इंटरव्ह्यूआधी काय खावे अन् काय टाळावे? पाहा ‘या’ पाच उपयुक्त टिप्स

  • सर्वप्रथम एका बादलीमध्ये कोमट गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडा बॉडीवॉश घालून, त्याचा फेस करून घ्यावा. त्यानंतर या पाण्यामध्ये १० मिनिटांसाठी पाय बुडवून बसावे.
  • त्यानंतर एका बाउलमध्ये इनो, कॉफी, साखर व पाणी मिसळून, त्याचे स्क्रब बनवून घ्यावेत.
  • आता हे स्क्रब आपल्या पावलांना व्यवस्थित चोळून लावावे. पावले आणि बोटांना लावलेले कॉफीचे हे सर्व मिश्रण ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने घासून घ्यावे. त्यामुळे नखांमध्ये साचलेली धूळ आणि मळ काढून टाकण्यास मदत होते.
  • पायांना स्क्रब करून झाल्यानंतर पाय व्यवस्थित धुऊन घ्या आणि मऊ टॉवेलने कोरडे करा.
  • त्यानंतर पायांसाठी चंदन पावडर आणि कच्चे दूध मिसळून त्याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट १० मिनिटांसाठी पायांना लावून ठेवा.
  • दहा मिनिटांनंतर पायांना लावलेली चंदनाची पेस्ट धुऊन घ्या आणि पुन्हा एकदा पाय कोरडे करा. सर्वांत शेवटी पायांना मॉइश्चराइजर लावून ठेवावे.

या घरगुती पेडिक्युअरचा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमाद्वारे @ravleenbaggaofficial नावाच्या अकाउंटने शेअर केला गेला आहे आणि त्या व्हिडीओला तीन मिलियन व्ह्युजदेखील मिळाले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to remove tan from your feet at home try this easy coffee and sugar pedicure dha