Remote Control Repair Tips: सध्या प्रत्येक घरामध्ये बहुतांश इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर सर्सास केला जातो. यापैकी बहेतूक उपकरणांना रिमोटने कंट्रोल करता येते ज्यामध्ये टिव्ही, एसी आणि ब्युटुथ स्पिकर किंवा एअर प्युरीफायर देखील समाविष्ठ आहे. पण तुम्हाला माहित असेल की काही महिने वापरल्यानंतर रिमोट कंट्रोल नीट काम करत नाही. अशा वेळी लोक पुन्हा नवीन रिमोट घेऊन येतात आणि त्यासाठी २०० ते ४०० रुपये खर्च करतात. जर तुमच्या इलेक्ट्रिक उपकरणांचा रिमोट खराब झाला असेल तर तो तुम्हाला घरीच दुरुस्त करता येईल हे तुम्हाला माहिती आहे. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही खराब रिमोट काही मिनिटांमध्ये व्यवस्थित करू शकता.
कार्बन काढणे
तुम्हाला तुमच्या कोणत्याही उपकरणाचा खराब झालेला रिमोट दिसल्यास, त्याच्या बॅटरी लावता त्या ठिकाणी धातूच्या स्प्रिंग्स आणि प्लेट्स जोडलेले आहेत. बर्याच वेळा या धातूच्या प्लेट्स आणि स्प्रिंग्समध्ये कार्बन जमा होतो किंवा त्याला गंज लागतो. अशा वेळी, धातूच्या स्प्रिंग्स आणि प्लेट्स लागलेला गंज आणि कार्बन काढून टाकण्यासाठी तुम्ही सँडपेपरच्या तुकड्याने ते स्वच्छ करू शकता. कारण यामुळे बॅटरीची पॉवर रिमोटपर्यंत पोहोचत नाही. हे केल्यावर तुमचा रिमोट ठीक होईल.
हेही वाचा – पावसाळ्यात घरात शिरणाऱ्या किड्यांपासून सुटका हवीये? ‘हे’ सोपे उपाय वापरून पाहा
IR ब्लास्टर साफ करणे
स्वच्छतेअभावी रिमोट कंट्रोलच्या पुढच्या बाजूला बसवलेल्या IR ब्लास्टरवर खूप धूळ साचत असल्याचे अनेकदा दिसून येते. या धुळीमुळे तुम्ही जेव्हाही रिमोट कंट्रोल वापरता तेव्हा तुमच्या उपकरणापर्यंत सिग्नल पोहोचत नाही. अशावेळी IR ब्लास्टरवर साचलेली घाण स्वच्छ कापडाने साफ करत राहावी. हे लाइटसारखे दिसते आणि प्रत्येक रिमोट कंट्रोलच्या समोर जोडलेले असते. तुमचा रिमोट व्यवस्थित काम करेल.