How to reuse all out refill : मच्छर पळवून लावणारे किंवा घरापासून दूर ठेवणारे ऑल आउटचे मशीन आजकाल जवळपास प्रत्येकाच्या घरात असते ज्याचे रिफील संपली की आपण ती फेकून देतो. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण त्याचा पुन्हा वापर करता येतो. तुम्ही रिफीलचा पुन्हा वापर करून रुम फ्रेशनर तयार करू शकता. त्यासाठी सोपी ट्रिक्स आम्ही सांगणार आहोत.
कसे तयार करावे रिफीलपासून रुम फ्रेशनर
साहित्य : कापूर, लवंग, वेलची, पाणी आणि सुगंधी तेल
पद्धत – सर्वात आधी रिफील व्यवस्थित साफ करून घ्या. आता ५ कापूर, ५ लवंग आणि २ छोटी वेलची घ्या. आता हे सर्व व्यवस्थित कुटून त्याची पावडर तयार करा. ही पावडर एका वाटीत काढा. आता त्यात पाणी आणि सुगंधी तेल टाकून एकत्र करून घ्या. आता हे मिश्रण रिफिलमध्ये टाकून मशिनमध्ये लावा. तुमच्या घरात छान सुंगध पसरेल.
हेही वाचा – पिठात किडे झाले तर काय करावे? हे सोपे उपाय वापरून पाहा, पीठ वाया जाणार नाही
रुम फ्रेशनर तयार करण्याची दुसरी सोपी पद्धत
एका वाटीत पाणी, बेकिंग सोडा आणि काही थेंब सुंगधी तेल टाकून एकत्र करून घ्या. मग ते स्प्रे बॉटलमध्ये साठवून ठेवा आणि घराच्या काना-कोपऱ्यात शिंपडा. त्यामुळे तुमचे घर नेहमी सुंगधी राहिल.