Jugaad Trick : नुकताच दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळी हा दिव्यांचा सण असतो. या दिव्यांना विशेष महत्त्व असते. दिवाळीत घरोघरी दिवे लावले जातात पण तुम्ही कधी विचार केला की दिवाळीनंतर या दिव्यांचे तुम्ही काय कराल? जर तुम्ही हे दिवे विसर्जित करण्याचा विचार करत असाल तर आताच थांबा. कारण आज आम्ही तुम्हाला हटके जुगाड सांगणार आहोत.
दिवाळीच्या या दिव्यांचा तुम्ही एका खास कामासाठी पूनर्वापर करू शकता. असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओंमध्ये दिव्यांपासून तांब्याची भांडी कशी चमकवता येते, हे सांगितले आहे.
असा करा पूनर्वापर
सुरुवातीला दिवा घासून आणि त्याची बारीक माती करा. त्यानंतर या मातील थोडे मीठ आणि आणि लिंबाच रस टाका. हे मिश्रण तांब्याच्या भांड्यावर लावून हाताने घासा. त्यानंतर हे तांब्याचं भांडं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर पुढे तांब्याचं भांडं चमकताना दिसेल. ही ट्रिक थक्क करणारी आहेत. तुमच्या कडे दिवाळीतील दिवे असतील तर तुम्ही सुद्धा याचा असाच वापर करू शकता.
हेही वाचा : हीच खरी माणुसकी! चिमुकल्या मुलांनी वाचवला कुत्र्याचा जीव, व्हिडीओ होतोय व्हायरल
अनेकदा आपण दिवाळीचे दिवे विसर्जित करतो पण दिव्यांचा असा वापर केला अधिक फायदेशीर ठरतो. दिव्यापासून बनवलेली ही घरगुती पिताम्बरी हा एक चांगला पर्याय आहे. अनेक लोकांना याविषयी माहिती नसेल पण आता तुम्ही याचा वापर करू शकता.