Kitchen Jugaad Video: उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे गारव्यासाठी पंखे, कूलर किंवा एसी वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. या उपकरणांमुळे विजेचा वापर वाढतो आणि वीजबिल जास्त येतं. अशा स्थितीत वीज वाचवण्याकरिता अनेक प्रयत्न केले जातात. पण काळजी करु नका कुलरमुळं येणारे वीजबिल कसे कमी करता येईल, यावर एका गृहिनीने भन्नाट जुगाड दाखविला आहे. या जुगाडाचा वापर करुन तुम्ही विजेची बचत करु शकता.
गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी याचे व्हिडीओ करून ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. दरम्यान असाच एक जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उन्हाळ्यात कुलरपासून येणारे वीजबिल कसे कमी करता येईल, यावर एका महिलेने भन्नाट जुगाड दाखविला आहे. हा जुगाड तुमच्या कामी येऊ शकतो. केलेला जुगाड पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(हे ही वाचा: Jugaad Video: मीठ खरेदी केल्यानंतर एकदा स्वयंपाकघरातील लाटण्यावर टाकून पाहा; काय कमाल झाली एकदा पाहाच!)
नेमकं काय करायचं?
कुलर सुरु करण्याच्या आधी खोलीतील पंखा सुरु करा. त्यामुळे खोलीतील गरम हवा बाहेर जाईल आणि यानंतर पंखा बंद करा, असे गृहिनीने सांगितले. गृहिनीने व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार, एक प्लास्टिकची बाटली घेतली आहे. या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पाणी घेऊन कुलरच्या मागे असलेल्या गवताच्या जाळीवर प्लास्टिकच्या बाटलीमधील पाणी हळूहळू टाका. पाणी टाकल्याने सुकलेलं गवत ओलं होईल. आपण पाणी टाकल्याने गवत लवकर ओलं होईल. यामुळे कुलरला जाळी ओली करायला जास्त वेळ लागणार नाही आणि कुलर लवकर थंड हवा देईल, यामुळे तुमच्या विजेचीही बचत होईल, असा दावा महिलेने केला आहे.
येथे पाहा व्हिडिओ
Avika Rawat Foods या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)