पोळ्या किंवा भाकऱ्या करतांना अनेकांना पीठ चाळणीने चाळून घेण्याची सवय असते. पीठ किंवा मैदा असे पदार्थ चाळत असताना मात्र एक समस्या प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला त्रास देत असते. ती म्हणजे, चाळले जाणारे पीठ पातेले किंवा परातीबाहेर उडणे. पीठ चाळत असताना आपण साहजिकपणे आपल्या हाताचा जोर कमी-जास्त होत असतो. त्यामुळे जेव्हा चाळणीने पीठ थोड्या जास्त शक्तीचे चाळले जाते तेव्हा ते परातीबाहेर जाते.
त्यामुळे स्वयंपाक करण्याआधी ओट्यावर किंवा जमिनीवर पसरलेले पीठ झाडून घेण्याचे अतिरिक्त काम आपल्याला करावे लागते. मात्र इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर sm.katta नावाच्या अकाउंटने पीठ चाळायची एक भन्नाट ट्रिक, युक्ती व्हिडिओमार्फत शेअर केली आहे. यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि पीठ परातीबाहेर अजिबात जाऊ न देता चुटकीसरशी कसे चाळायचे हे दाखवलेले आहे. चला तर तुम्हीही ही ट्रिक पाहा. तसेच घरी एक प्रयोग म्हणून करून बघू शकता.
पीठ चाळायची सोपी ट्रिक
साहित्य
चाळणी
पाणी पिण्याचा ग्लास
परात
पीठ
कृती
- सर्वप्रथम एक परात घेऊन त्यावर चाळणी ठेवा.
- आता एका पाणी पिण्याच्या ग्लासमध्ये पीठ घ्या.
- पीठाने भरलेला ग्लास परातीत ठेवलेल्या चाळणीवर उपडा करून तसाच ठेवा.
- आता चाळणी परातीपासून थोडी वर उचलून घ्या आणि त्यामध्ये पीठाने भरलेला ग्लास गोल-गोल फिरवून घ्यावा.
- अगदी भराभर आणि पीठ कुठेही न उडता काही सेकंदात सर्व पीठ चाळले गेल्याचे आपण शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.
हेही वाचा : जुनी पितळी भांडीही दिसतील नव्यासारखी चमकदार! पाहा ‘Kitchen’मध्येच दडलंय त्याच गुपित…
अनेकदा स्वयंपाक सोप्या पद्धतीने कसा करावा, भाज्या झटपट कसा चिराव्या, पीठ कसे मळावे अशा पद्धतीच्या अनेक टिप्स आपल्याला इंटरनेटवर दाखवल्या जातात. मात्र स्वयंपाकघरातील इतर कामे झटपट आणि सोप्या पद्धतीने कशी करायची याची हॅक्स किंवा ट्रिक्स प्रमाणे कमी दाखवल्या जातात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पीठ चाळण्याची युक्ती खूपच सोयीची असल्याचे नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून समजते. काय म्हणत आहेत नेटकरी पाहा.
“धन्यवाद काकू” असे एकाने लिहिले आहे. “wow खूप मस्त आणि महत्वाची ट्रिक आहे.” असे दुसऱ्याने म्हंटले आहे. “हो घाईच्या वेळी लवकर पीठ चाळायचे असेल तेव्हा मीसुद्धा ही ट्रिक वापरते.” असे तिसऱ्याने सांगितले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत १.८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहे.