How To Sleep In Seconds: लवकर निजे, लवकर उठे त्यासी धनसंपदा लाभे.. हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. खरं सांगायचं तर आपल्यापैकी अनेकजण या नियमाला पाळण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. अगदी ७ तासांच्या झोपेचं गणित आखून वेळेत बेडवर पडूनही काही वेळा झोपच लागत नाही. मग चल काहीतरी वाचू/ बघू असं म्हणून आपण एखादं पुस्तक किंवा फोन हातात घेतो आणि मग पुढे काय घडतं हे आम्ही वेगळं सांगायची गरज नाही, बरोबर ना? पण तुम्हाला माहित आहे का आपलं शरीरच आपल्या सगळ्या समस्यांचं कारण व उत्तर दोन्ही देत असतं. तुम्हाला झोप लागत नसल्यास शरीराने एक अगदी सोयीस्कर पर्याय दिला आहे. एखादं बटण दाबून लाईट किंवा पंखा जसा बंद होतो तसंच तुम्ही हे शरीरातील एक बटण दाबून क्षणात झोपी जाऊ शकता. कुठे आहे हे बटण आणि त्याचा वापर कसा करायचा चला पाहुयात..

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गाढ झोपण्यासाठी तुमचे मन शांत असणे आवश्यक आहे. मन शांत करण्यासाठी व झोप लागण्यासाठी निसर्गतः तुमच्या कानामागे एक स्नूझ बटण दिलेलं आहे. याला अॅनमियान म्हणतात, ज्याचा अर्थ शांत झोप आहे. राडोस्लाव नामक एक्यूपंक्चर तज्ज्ञांनी या बटणाचा वापर करून पटकन कसे झोपी जायचे हे सांगितले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

कुठे असतं झोपेचं बटण?

झोपेचं बटण हे तुमच्या कानाच्या अगदी मागेच दिलेले आहे. मानेच्या दोन्ही बाजूंना व कानाच्या मागे असणारे हे बटण आपल्याला उदासीनता व ताण- तणाव विसरण्यास मदत करते.

झोपेचं बटण कसं वापराल?

पाठीवर झोपा व हे बिंदू हळूवारपणे दाबा. प्रत्येक बिंदूवर (दोन्ही बाजूंनी) सुमारे 30 सेकंद दाब द्या.
या पॉईंट्सवर दाब देताना खांदे व छाती सैल ठेवा.
यामुळे हृदयापर्यंत रक्त नेणाऱ्या वाहिनीला रक्त वाहण्यास मदत होते,परिणामी चटकन झोप येण्यास मदत होते.

ऍक्युप्रेशरने खरंच झोप येऊ शकते का?

डॉ. संतोष पांडे, ऍक्युपंक्चर आणि निसर्गोपचार, रेजुआ एनर्जी सेंटर म्हणाले की, अनिद्रावर उपचार करण्यासाठी अॅनमियन हा पॉईंट आहे. ज्यावर दाब दिल्याने चिंता, तणाव, चक्कर येणे, डोकेदुखी असे त्रास कमी होतात तसेच आणि मन शांत होण्यास मदत होते.

ऍक्युप्रेशर कशी मदत करते?

ऍक्युप्रेशर हा अ‍ॅक्युपंक्चरचा प्रकार आहे. योग तज्ञ, मानसी गुलाटी, यांनी सांगितले की ऍक्युप्रेशर तुमच्या शरीराला सक्रिय करते ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.शरीरातील काही विशिष्ट बिंदूंवर थोडासा दाब दिल्याने विशिष्ट अवयवांना उत्तेजित करून आणि रक्त परिसंचरण नियंत्रित करता येते. सायनसच्या समस्या, थकलेले डोळे, डोळे लाल होणे, डोकेदुखी आणि तणाव या सर्व समस्यांवर ऍक्युप्रेशर परिणामकारक ठरू शकतो.

हे ही वाचा<< खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढते ‘ही’ चटपटीत चटणी; चला बघूया आहारतज्ज्ञांची सोपी रेसिपी

असे असले तरी झोपेसाठी व निरोगी शरीरासाठी उत्त जीवनशैली पाळायला हवी. अपोलो हॉस्पिटल्स, शेषाद्रिपुरम, यूरोलॉजिस्ट आणि अॅन्ड्रोलॉजिस्ट डॉ प्रशांत गणेश यांच्या मते, मानसिक तणाव व्यवस्थापित करण्याचे आणि झोपेचे आरोग्य सुधारण्याचे अनेक मार्ग आहेत. यासाठी खालील पाच नियम पाळून सुरुवात करा.

हे ही वाचा<< शौचावाटे लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ ५ पदार्थ? तज्ज्ञांनी सांगितली डिटॉक्सची पद्धत

  • नियमित व्यायाम करा
  • आहार आणि पोषण, संतुलित वजन राखणे
  • विश्रांतीसह योग, ध्यान
  • आवश्यक तेवढी झोप
  • हसणे व आनंदी राहणे

Story img Loader