Shoes Smell : अनेक जण शूजमधून येणाऱ्या वासामुळे त्रासलेले असतात. वेगवेगळे उपाय करूनही काहीही फायदा होत नाही. जर तुमच्या शूजमधून सतत दुर्गंध येत असेल, तर टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत ….
शूजमधून सतत दुर्गंध का येतो?
खूप वेळ शूज घालून राहिल्याने पायांना घाम येतो; ज्यामुळे शूज आणि मोजांमध्ये ओलावा निर्माण होतो. खूप जास्त वेळ हा ओलावा राहिल्यामुळे शूज, मोजांना दुर्गंध येतो.
हेही वाचा : चांदीचे दागिने काळे पडलेत? वापरा ‘या’ घरगुती ट्रिक्स; पाच मिनिटांत चांदी चमकेल नव्यासारखी
घाम शोषून घेणारे मोजे वापरा
शूज आणि पायांना दुर्गंध येण्यामागे सर्वांत मोठे कारण आहे ते म्हणजे घाम. घाम शोषून घेण्यासाठी मोजे घालणे हा सर्वांत बेस्ट ऑप्शन आहे . घाम शोषून घेणारे मोजे वापरा. त्यामुळे शूजना कधीही दुर्गंध येणार नाही.
शूज आणि इनसोल नियमित धुवा
बॅक्टेरियामुळे शूजमध्ये दुर्गंध तयार होतो. त्यासाठी शूज आणि इनसोल नियमितपणे धुवावेत आणि धुतल्यानंतर ते चांगले वाळू द्यावेत. ओले शूज कधीही घालू नयेत. कारण ओले शूज घातल्यास आणखी ओलावा निर्माण होऊन बॅक्टेरिया निर्माण होण्याचा धोका वाढतो; ज्यामुळे शूजना दुर्गंध येऊ शकतो.
हेही वाचा : किचन सिंक ब्लॉक झालंय? प्लंबरला बोलवण्याची काहीही गरज नाही…हे घरगुती उपाय वापरून पाहा
पायांवर डिओड्रंट स्प्रे मारावा
शूजमधून येणारा दुर्गंध घामापासून तयार होणाऱ्या बॅक्टेरियामुळे येतो. त्यामुळे पाय नेहमी कोरडे ठेवावेत. पाय कोरडे असतील, तर बॅक्टेरिया तयार होणार नाहीत आणि मग दुर्गंधही येणार नाही. इतके करूनही काहीही फायदा होत नसेल, तर पायांवर डिओड्रंट स्प्रे मारावा त्यामुळे पाय कोरडे राहतात आणि पायांना घाम येत नाही.